वाशीम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवी येथे दाखल झाले आहेत. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, त्या दोघांनी मिळून राज्याचा कारभार करावा, यासाठी मी मुंबई येथे जाणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. येथील महंत कबीरदास महाराज म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळावी. दोन्ही पक्षांतील नेते, आमदार, खासदार यांनी त्यांना साथ द्यावी. कोणीतरी दोन पाऊले मागे यावे, अशी माझी इच्छा असून यासाठी मी मुंबई येथे जाऊन मागणी करणार आहे.