वर्धेतील बचतगटाशी संबंधित काम करणाऱ्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापुढे सोमवारी हनुमान चालिसा वाचण्यापासून पोलिसांनी रोखले होते. या महिलांच्या मागण्यांबाबत मंगळवारी वर्धेत सकारात्मक बैठक झाली. त्यानुसार आज (१५ फेब्रुवारीला) आंदोलकांना लेखी आश्वासन मिळाल्यावरच आंदोलक त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
हेही वाचा >>> वर्धा :…म्हणून ८० वर्षांच्या गांधीवाद्याचे उपोषण
वर्धेतील बैठकीला महाराष्ट्र राज्य जीवनउन्नती अभियान विभागासह इतरही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने युवा: परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे आणि इतर उपस्थित होते. बैठकीत प्रभाग संघ व्यवस्थापकांचा रोजगार जाणार नाही, असे आश्वासन दिले गेले.
हेही वाचा >>> नागपूर : ‘एमबीबीएस’ला प्रवेश पाहिजे, ५० लाख द्यावे लागतील…
सोबत महिलांचे वेतन ५ हजारावरून १० हजार करणे, या महिलांना १०१९ पासून ५ टक्के वेतनात वाढ, नवीन सेवेवर घेण्याचा करारही ५ टक्के वेतन वाढ देऊन करण्यासह इतरही काही मुद्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्याचा दावा निहाल पांडे यांनी केला. या सगळ्या मुद्यांवर प्रशासन शासनासोबत सविस्तर चर्चा करणार आहे. सोबत या बैठकीचे लेखी आश्वासन आंदोलकांना बुधवारी दिले जाईल. त्यात दिलेले आश्वासन पूर्ण झाल्यास आंदोलन मागे घेतले जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.