वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा, ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा’ हा उपक्रम अनाथांचा सण गोड करणारा ठरला.
होळीला पुरणपोळी व गाठीचा नेवैद्य भक्तिभावाने करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात पाळल्या जाते. राज्यात असा हजारो क्विंटलचा नेवैद्य भक्ष्यस्थानी पडत असल्याने व त्याचवेळी पोट खपाटीला गेलेले हजारो भूक मारणारे अन्नासाठी आस लावून बसले असतात. ही विसंगती दूर करीत अनिसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शहरातील होळी पेटलेल्या स्थानी भेट दिली. नैवेद्य दाखविणाऱ्या बंधू भगिनींना विनंती करीत तो गोड घास जमा केला. एवढेच नव्हे तर सोबत आणखी काही द्या, अशी विनंती केल्यावर खाद्यपदार्थही मिळाले. हा प्रसाद जमा झाल्यानंतर संघटनेने हे सुग्रास अन्न रेल्वे व बस स्थानक परिसर, फुटपाथवर झोपणारे भिकारी यांना रात्री बारा वाजता खाऊ घातले.
हेही वाचा – बुलढाणा : नऊ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, मोताळा तालुक्यातील घटना
हेही वाचा – गोंदिया : बैलगाडा शर्यतीत सट्टा शौकिनांचा राडा; दगडफेकीसह पोलिसांना धक्काबुक्की
धर्माच्या अनिष्ट परंपरांची चिकित्सा करणे व त्यास काल सुसंगत पर्याय देण्याची संघटनेची भूमिका असल्याचे गजेंद्र सुरकार म्हणाले. अन्न गोळा करीत त्याचे वाटप करण्यात महिला आघाडीवर असल्याचे दिसून आले.