वर्धा : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा बडगा टळावा म्हणून उमेदवार व राजकीय पक्ष विशेष खबरदारी घेतात. सध्या सोशल मीडियाचा प्रचार करण्यासाठी उपयोग व दुरुपयोग पण होतो. म्हणून निवडणूक कार्यालय व पोलीस विभाग पण दक्ष असून त्यासाठी निगराणी पथक पण नेमल्या गेले आहेत. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्यामुळे अडचण येवू शकते हे हेरून उमेदवार संवाद साधण्यासाठी कमालीची काळजी घेत आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप , इंस्टाग्राम, एक्स, थ्रेड्स, स्नॅपचॅट अशी व विविध अस्त्रे या माध्यमात संवाद किंवा संदेश देण्यासाठी उपलब्ध आहेत.

पण सामान्य जनतेत व्हॉटसअ‍ॅप ऍप हेच सरसकट वापरल्या जात असल्याचे दिसून येते. मोबाईलवरून साधलेला संवाद व्हायरल झाल्याने भले भले अडचणीत आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. मुद्दाम शेती किंवा विकास कामांची चर्चा करीत उमेदवारास ओघात भलताच प्रश्न विचारून तोंडघशी पाडायचे व तो संवाद व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार माजी खासदार रामदास तडस यांच्याबाबत घडला होता. म्हणून आता ते सुद्धा या काळात व्हॉटसअ‍ॅपवरुन कॉल करू लागले आहे. आता राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया घ्यायची झाल्यास उमेदवार म्हणतो, थांबा व्हॉटसअ‍ॅप कॉल करतो. तंत्रस्नेही नसलेले काही मग पी. ए. कडून असा कॉल लावून घेत बोलतात. अशी ही धास्ती आता दिसून येत आहे.

supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!
elon musk daughter Vivian Jenna Wilson
Elon Musk Daughter: ‘अमेरिकेत माझे भविष्य कठीण’, ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या तृतीयपंथी मुलीनं व्यक्त केली खंत
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai book
Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान; म्हणाल्या, “ते म्हणतील तिथे म्हणतील त्या वेळी…”

अनेकदा विविध मागण्या कार्यकर्ते उमेदवारास फोनवरून करतात. तेव्हा हे असे बोलणे अंगलट येवू शकते हे हेरून फोन कट करने केव्हाही चांगले, असे संवादचा वाईट अनुभव आलेल्या एका नेत्याने स्पष्ट केले. म्हणून सध्या सर्वत्र ओन्ली व्हॉटसअ‍ॅप हाच संवादसाठी परवलीचा कोड ठरला आहे. सविस्तर बोलायचे असेल तर मग उमेदवार म्हणतो प्रत्यक्ष भेटीतच बोलूया नं. चांगल्या माहितीपेक्षा खोटी माहिती ही वेगाने पसरते. युवा मतदारांची संख्या लक्षनीय असल्याने सोशल मीडियावरच राजकीय वादावादी रंगत असल्याचे चित्र आहे. त्यातून एकमेकांवार हल्ले झाल्याचा प्रकार हिंगणघाट येथे महिन्याभरपूर्वी घडला होता. म्हणून आता ऍडमिन पटकन चुकीची टीका डिलीट करीत खबरदारी घेत असल्याचे दिसून येते. पण सर्वात दक्ष व विशेष खबरदारी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार घेत असून मोबाईलवर बोलणे बंद, असे बंधनच त्यांनी स्वतःला घालून घेतले आहे. एकदाचे ‘ निरोप ‘ पोहचले नाही तरी चालेल, पण व्हॉटसअ‍ॅप कॉल शिवाय बोलणे नकोच, अशी भूमिका.