चंद्रपूर : शहरातील सर्व मुख्य मार्ग, प्रमुख रस्ते, बगीच्या, वार्ड व प्रभागातील सर्व भागात पहाटेच्या सुमारास २०० रूपयांच्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला. जवळपास पाच ते सात करोड रूपयांच्या या नोटा ठिकठिकाणी आढळल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे सर्वत्र उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा असल्याचे व त्याचे दुसरे बाजूला २०० युनिट तथा विश्वास जुना. धोका नवा असे लिहिले होते. शहरात या नोटांचा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या उत्साहात चंद्रपूर शहरात शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी लोकांना २०० रुपयांच्या नोटा अनेक ठिकाणी रस्त्यावर, बगीच्यात अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या. त्यामुळे सर्वत्र उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.

Devendra fadnavis ajit pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस – अजित पवार आमने सामने! ‘बटेंगे तो कटेंगे’वरून महायुतीत जुंपली? म्हणाले, “राष्ट्रवादी मिजाज…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Live : “महाराष्ट्राला स्वतःचं रेल्वे मंडळ असायला हवं”, मनसेच्या जाहीरनाम्यात राज ठाकरेंची तरतूद
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

अनेकांनी मागे वळून रस्त्यावर विखुरलेल्या २०० रुपयांच्या नोटा उचलल्या असता, नोटांची दुसरी बाजू पाहिल्यानंतर या नोटा डमी आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या नोटा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या नोटा शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने विखुरल्या गेल्या होत्या की लोकांना त्या खऱ्या नोटा असल्याचे समजले, मात्र या नोटांची दुसरी बाजू पाहिल्यावर या नोटा प्रचारासाठी अवलंबण्यात आलेले डावपेच असल्याचे समोर आले.

विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असतांना भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना या माध्यमातून लक्ष करण्यात आले आहे. शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा असतांनाच्या पार्श्वभूमीवर जोरगेवार यांना लक्ष करणारी ही खेळी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेल्या या २०० रुपयांच्या डमी नोटांच्या मागील बाजूस ‘२०० युनिट मोफत देण्याचे आश्वासन, विश्वास जुना, धोका नवा’ अशा घोषणा लिहिलेल्या आढळून आल्या.

हे ही वाचा… तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला टार्गेट करून मध्यरात्री शहरात सर्वत्र या नोटा कोणीतरी विखुरल्याचे अशा नोटा जप्तीवरून स्पष्ट झाले. शहरात सापडलेल्या नोटांच्या या प्रकारांमुळे एकीकडे जिल्ह्यातील राजकीय विभागात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे नोटांचा हा पाऊस सर्वसामान्य मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील प्रत्येक नागरिक व मतदारांच्या हातात या नोटा दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरच नाही तर झोपडपट्टी मध्येही या नोटा पहाटेच्या सुमारास मिळाल्या आहे.