लोकसत्‍ता टीम

अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि वर्ध्‍यातून राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अमर काळे यांच्‍या विजयाच्‍या आनंदावर अवघ्‍या पाच महिन्‍यात विरजण पडले. बळवंत वानखडे यांनी अमरावती, तिवसा, दर्यापूर, अचलपूरमध्‍ये तर अमर काळे यांनी धामणगाव रेल्‍वे या मतदारसंघांमध्‍ये मताधिक्‍य मिळवले होते. या पाचपैकी चार ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीच्‍या दोन्‍ही खासदारांसाठी ही निवडणूक सतर्कतेचा इशारा देणारी ठरली आहे.

Four rabid Naxalites surrender gadchiroli news
२८ लाखांचे बक्षीस, ८२ गुन्हे…चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
Buldhana, Motala , dabhadi robbery, wife murder ,
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
traffic stopped due to snake crossing road on khambatki ghat
सातारा : सरपटणाऱ्या जीवासाठी खंबाटकी घाट थांबला
koliwada villagers closes jnpa sea channel for rehabilitation
जेएनपीए विस्थापित कोळीवाडा ग्रामस्थ पुन्हा आक्रमक; पुर्नवसनासाठी जेएनपीए समुद्र चॅनेल बंद केले

काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना अमरावतीतून ४१ हजार ६४८ इतके भरघोस मताधिक्‍य मिळाले होते. त्‍यांचे गृहक्षेत्र दर्यापूर, तिवसा आणि अचलपूरमधूनही त्‍यांना साथ मिळाली होती. बळवंत वानखडे यांना तिवसामधून १० हजार ५७६, दर्यापूरमधून ८ हजार ६७१ तर अचलपूरमधून ६ हजार ७९३ इ‍तके मताधिक्‍य मिळाले होते.

आणखी वाचा-‘अमरप्रेम आटले!’ पण खासदार काळेंचे ‘ते’ बोलही खरे ठरले…

भाजपच्‍या पराभूत उमेदवार नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून तब्‍बल २६ हजार ७६३ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ५९५ इतके मताधिक्‍य मिळाले होते. दर्यापूरमध्‍ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला विजय मिळाल्‍याने बळवंत वानखडे यांना हायसे वाटले असणार, पण तिवसा, अचलपूर, अमरावती या तीनही ठिकाणी काँग्रेसला वर्चस्‍व राखता आले नाही. ही या पक्षासाठी चिंतनाची बाब ठरली आहे. तिवसामध्‍ये काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांना पराभव पत्‍करावा लागला. अचलपुरात काँग्रेसचे बबलू देशमुख यांना तिसरे स्‍थान मिळाले. अमरावतीतही काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांना पराभव पत्‍करावा लागला. जिल्‍ह्यात काँग्रेसचा खासदार असला, तरी विधानसभेत प्रतिनिधित्‍व करायला एकही आमदार नाही, अशी अवघड स्थिती काँग्रेसची झाली आहे.

आणखी वाचा-विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की, काँग्रेसच्या विजयानंतर अकोल्यात…; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, मेळघाटात १ लाख ६ हजार इतक्‍या मताधिक्‍याने विजय मिळवून भाजपने काँग्रेसला चांगलाच धक्‍का दिला आहे. बडनेरातून रवी राणांनी पुन्‍हा एकदा विजय मिळवला. त्‍यांना तब्‍बल ६६ हजार ९७४ इतके मताधिक्‍य मिळाले आहे. मोर्शीत भाजपचे पराभूत उमेदवार रामदास तडस यांना १४ हजार ९७५ इतके मताधिक्‍य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेश यावलकर यांनी वाढवून ते ६४ हजार ९८८ वर नेले आहे. धामणगाव रेल्‍वेत खासदार अमर काळे यांना १४ हजार २२३ इतके मताधिक्‍य मिळाले होते. यावेळी भाजपने जागा राखतानाच १६ हजार २२८ इतके मताधिक्‍य मिळवले आहे. महाविकास आघाडीच्‍या दोन्‍ही खासदारांना जमिनीवर आणणारे हे निकाल ठरले आहेत.

Story img Loader