राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उद्या १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात युवा स्वाभिमानचे उमेदवार अरुण बुंदीले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा यांचं भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचं न ऐकता घोषणाबाजी सुरु ठेवली. तेव्हा नवनीत राणा स्वत: त्यांना समजावण्यासाठी जात असतानाही काही लोकांनी त्यांच्या दिशेने खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एक खुर्ची नवनीत राणा यांच्या अंगरक्षकालाही लागली.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

हेही वाचा – कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,

यासंदर्भात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. आम्ही शांततेत प्रचार करत होतो. माझं भाषण सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. माझ्या दिशेने बघून घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्या. भाषण झाल्यानंतर मी स्वत: त्यांच्याकडे समजावण्यासाठी गेली. मात्र, त्या लोकांनी माझ्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – “राणा दाम्‍पत्‍याला अमरावती जिल्‍ह्यात भाजप संपवायची आहे”,बच्‍चू कडू यांची टीका

पुढे बोलताना, या घटनेनंतर आम्ही गुन्हा दाखल केला असून हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जर सकाळी १० वाजेपर्यंत त्यांना अटक झाली नाही, तर अमरावतीत वेगळं चित्र बघायला मिळेल. आम्ही सगळेच रस्त्यावर उतरू, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला. दरम्यान, याप्रकरणी आता २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.