नागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. काटोल, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघांसह हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २४ डिसेंबर २०२३ ला सुनील छत्रपाल केदार यांना महाराष्ट्र विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याने सावनेर विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून पत्नी अनुजा केदार यांना उभे केले होते.

त्यांच्या विरोधात भाजपचे डॉ. आशिष देशमुख उभे होते. देशमुख हे सध्या वीस हजारांनी समोर असून हा सुनील केदार यांना फार मोठा धक्का मानला जातो आहे. यामुळे केदार यांचा अनेक वर्षांचे प्रस्त धोक्यात आले आहे.

हेही वाचा…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिछाडीवर, कॉंग्रेसचे सुरेश भोयर आघाडीवर

सावनेर मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा होती. २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्यांनी निवडणूक गाजवली होती. यावेळी भाजपचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तर, काँग्रेसकडून नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या लढत होत्या. त्यांच्या विजयासाठी केदार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्याने सुनील केदार यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना काँग्रेसने तिकीट दिली होती. तर, सुनील केदार यांचे साम्राज्य हलवण्यासाठी भाजपने डॉ. आशिष देशमुख यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत.

Story img Loader