नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षात घेता विदर्भातील ६२ पैकी बहुतांश मतदारसंघात ‘उदंड झाले अपक्ष’ असे चित्र आहे. यावरून महाराष्ट्रातही ‘हरियाणा पॅटर्न’ची खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. चिखली, कारंजा, वाशीम, बडनेरा, अचलपूर, उमरखेड या मतदारसंघात २०१९ मध्ये जेथे ४ ते ५ अपक्ष उमेदवार होते, आता तेथे ही संख्या ३० ते ३५ वर गेली हे विशेष.हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने हरियाणात अपक्ष उमेदवारांच्या मदतीने सुक्ष्म व्यवस्थापन करत जातींच्या विभाजनातून सत्ता मिळवल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

हीच खेळी भाजप महाराष्ट्रात खेळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ४ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु, २०१९ च्या निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष आणि २०२४ ला आतापर्यंत अर्ज वैध ठरलेल्या अपक्षांची संख्या बघता बहुतांश मतदारसंघात अपक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. विदर्भातील राखीव मतदारसंघ आणि मुस्लीमबहूल भागामध्ये मोठय़ा प्रमाणात जातीय विभाजनावर भर दिल्याचे २०१९ आणि २०२४ च्या अपक्ष उमेदवारांच्या संख्येवरून स्पष्ट होते. बडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा महायुतीचे उमेदवार असून या मतदारसंघात ३६ अपक्षांनी अर्ज भरले आहेत. २०१९ मध्ये येथे केवळ ८ अपक्ष होते, हे उल्लेखनीय.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>>बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार

दलित व मुस्लीम मतविभाजनावर लक्ष

दलित व मुस्लीम यांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीकडे जाण्याचा धोका टाळण्यासाठी या मतदारांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या मतदारासंघात अपक्ष उमेदवारांचे चांगलेच पीक आले आहे. दलित आणि मुस्लीम मतांच्या विभाजनावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. विदर्भातील मूर्तीजापूर, उमरेड, भंडारा, चंद्रपूर, अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात अपक्षांची संख्या  २० पेक्षा अधिक आहे. अर्जुनी मोरगावमध्ये यंदा २७ अपक्ष आहेत. २०१९ मध्ये येथे केवळ ३ अपक्ष होते. याशिवाय मध्य नागपूर, यवतमाळ, चिखली, मलकापूर अशा मुस्लीमबहूल मतदारसंघात मोठय़ा संख्येने मुस्लीम अपक्ष उमेदवार आहेत.

हेही वाचा >>>Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा

धोका असणाऱ्या जागांवर अधिक अपक्ष

राजकीय पक्ष आाणि विविध खासगी संस्थांकडून झालेल्या सर्वेक्षणात ज्या मतदारसंघात भाजपला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे, तेथे अपक्ष उमेदवारांची  संख्या जास्त असल्याचेही दिसून येत आहे.

मतदारसंघनिहाय अपक्षांची संख्या

मतदारसंघ — (२०२४) अर्ज माघारीपूर्वीची संख्या — २०१९ मधील अपक्ष

मलकापूर — १६— ०६

बुलढाणा — १३ —०८

चिखली— ३५— ०३

सिंधखेड राजा — ३० — ०६

मेहकर— २१ —०१

खामगाव— १४ — ०२

जळगाव जामोद— ०९— ०९

अकोट— १४— ०७

बाळापूर — २२ — ०६

अकोला पश्चिम— १०— ०४

अकोला पूर्व — ०९— १५

मूर्तिजापूर— २४ — ०८

रिसोड — १०— ०८

वाशीम — ३१— ११

कारंजा — ३४ — ०३

धामनगाव रेल्वे — १४ — ११

बडनेरा— ३६— ०८

अमरावती— १९ — ०९

तिवसा — २१ — ०२

दर्यापूर — २३— ०८

मेळघाट — १८ — ०३

अचलपूर — २३ — ००

मोर्शी — १९— ०८

आर्वी— १४ — ०४

देवळी— ०६ — ०६

हिंगणघाट— ०८ — ०७

वर्धा — २०— ०५

काटोल — ११ — ०२

सावनेर — ०८ — ०२

हिंगणा — १४ — ०६

उमरेड — १४ — ०२

नागपूर दक्षिण—पश्चिम — ०६ — ०७

नागपूर दक्षिण— ०८ — ०६

नागपूर पूर्व— १२ — ०५

नागपूर मध्य— २२ —             ०५           

नागपूर पश्चिम — १४ — ०८

नागपूर उत्तर — ११— ०५

कामठी— १५ — ०५

रामटेक — १५ — ०३

तुमसर— १६— ०५

भंडारा— २३ — ०८

साकोली — ११— ०७

अर्जुनी मोरगाव— २७— ०३

तिरोडा— २२— ०८

गोंदिया— २४ — ११

आमगाव— ०८ — ०४

आरमोरी— ०७ — ०६

गडचिरोली — ०८ — ०८

अहेरी— ०९— ०३

राजुरा — १० — ०५

चंद्रपूर— १० — ०४

बल्लारपूर — २० — ०५

ब्रम्हपुरी— ०६ — ०४

चिमूर — ११ — ०४

वरोरा — १८ — ०४

वणी— ०८ — ०५

राळेगाव— — ०९— ०४

यवतमाळ— २५— ०८

दिग्रस— ११— ०४

आर्णी — २१ — ०५

पुसद— २१ — ०७

उमरखेड — ३७— ०३

Story img Loader