गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुरजागड प्रकल्प सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे मला धमक्या देखील आल्या. नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला. आता या प्रकल्पामुळे या भागातील नक्षलवाद कमी झाला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदे केला.
शिंदे म्हणाले, पालकमंत्री असताना मी सुरजागड प्रकल्पाची पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी नक्षलवादी काम करू देणार नाहीत, अशी बाब समोर आली. मी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले. सरकारपुढे नक्षलवाद्यांची हिम्मत होणार नाही आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी प्रकल्प सुरू केला. संबंधित लोकांना बोलावले. स्थानिकांना रोजगार देण्याची सूचना केली. महिलांसाठी विविध प्रशिक्षण सुरू करून रस्ते, आरोग्य सुविधा निर्माण केल्या. या प्रकल्पामुळे वर्षभरात सुमारे ४५० कोटींचा महसूल मिळाला. आता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असल्यानंतर आम्ही जातीने या प्रकल्पात लक्ष घालू आणि हा प्रकल्प कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करू, असेही शिंदे म्हणाले.
मी पालकमंत्री असतानाच २७ नक्षलवाद्यांचा खात्मा
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी पोलिसांच्या पाठिशी आहे. पालकमंत्री असतानाही मी पोलिसांच्या पाठिशी होतो. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे “एन्काऊंटर” म्हणजे २७ नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला.
नितीन देशमुखांना अटक होणार नाही
नितीन देशमुखांना अटक होणार नाही. हे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. असेही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिषदेत म्हणाले.