महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याने विरोधकांनी टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात प्रथम भाष्य करत आज ठराव मांडायला हवा होता असं सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर देताना आमची मान झुकवण्याची ताकद कोणाच्याही बापामध्ये नाही असं म्हटलं.

अजित पवारांनी मांडला ठरावाचा मुद्दा

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठरावा यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं सर्वांचं मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे,” असं अजित पवार म्हणाले.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut
Sanjay Raut : “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक, आरोपींना वाचवण्यासाठी…”; संजय राऊत यांचा आरोप
Register a case against Manoj Jarange Patil, protesters demand outside Shivajinagar police station in Pune
“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव

बघ्याची भूमिका घेऊ नका – पृथ्वीराज चव्हाण

यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलण्यास उभे राहिले होते. “महाराष्ट्र शासनानं हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात २००४ साली दाखल केला आहे. कर्नाटकचा त्यावर प्रतिदावा आहे. राजकीय दृष्टीने वादग्रस्त वक्तव्यं करुन प्रकरण चिघळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांकडे हा विषय न्यावा अशी माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. जाणुनबुजून परिस्थिती चिघळण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त बघ्याची भूमिका घेता कामा नये. सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत. बघ्याची भूमिका घेऊन आपण त्याला काही उत्तर देत नाही हे बरोबर नाही. कर्नाटकला गंभीर इशारा दिला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर देवेंद्र फडणवीस उभे राहिले असता विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. मांडलेला विषय महत्त्वाचा आहे असून यावर सभागृह एकजूट आहे. या विषयावर वातावरण बिघडवू नये असं आवाहन करत त्यांनी अध्यक्षांना भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती केली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत”

“सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघङड्या डोळ्याने पाहायचं का?,” अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.

“…कोणाच्या बापात हिंमत नाही”

यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी उभे राहिले. “या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,” असं फडणवीस म्हणाले.

“मागील आठवड्यातील वातवारण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता, पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होत. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही,” असं आश्वासन त्यांनी विरोधकांना दिलं.

Story img Loader