Maharashtra Political Headlines, Winter Session Of Maharashtra Assembly Nagpur : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार असून आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्ल्याचे बघायला मिळाले. यावरून विधानसभेत गदारोळ देखील बघायला मिळाला. दरम्यान, विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.
Maharashtra News Today, Winter Session Of Maharashtra Assembly : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त; वाहतूक व्यवस्थेतही बदल
उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या समर्थकांसह भेट घेतल्याने ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच हा अधिकृत प्रवेश सोहळा संपन्न होऊन चौधरी यांना जिल्हा पातळीवर पद देण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एलॉन मस्क यांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. वाचा सविस्तर बातमी…
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (एनआरडीसी) लोकसंपर्क केंद्र (आउटरीच सेंटर) आघारकर संशोधन संस्थेत स्थापन करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीत आठपेक्षा अधिक प्रभाग असलेल्या दिवा परिसरातील कचराभूमीचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने दिवा कचराभूमी बंद करण्यासाठी पावले उचलून तशी घोषणा केली होती.
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी पक्षकारांशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालायच्या सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी पक्षकारांशी संवाद साधला.
रात्रगस्तीवरील महिला पोलीस अधिाकाऱ्यास धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत परिसरात ही घटना घडली.रवींद्र उर्फ सोन्या संजय खंडागळे (रा. पीएमसी काॅलनी, घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत जनतेकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाचे वर्णन ‘नॅनो’ मोर्चा असे केले. यामुळे शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ ट्वीट करून मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा व्हिडीओ मराठा मोर्चाचा असल्याचं बोललं जात असल्याने, आता यावरून भाजपाकडून संजय राऊतांवरच पलटवार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोलाही लगावला. वाचा सविस्तर बातमी…
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरु असल्याने त्यांनी गप्प बसा असं सांगत फटकारलं. महत्त्वाचं म्हणजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटवर खात्यावरुन ट्वीट करणारी व्यक्ती सापडली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. भाषण असो किंवा पत्रकार परिषद…अजित पवार कधीही हातंच राखून बोलत नाहीत. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव पुन्हा एकदा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सर्वांना आला. सहकारमंत्री अतुल सावे समोर येताच अजित पवार यांनी त्यांना चिमटे लगावले. यानंतर अतुल सावे यांनीही त्यांच्यासमोर हात जोडले. अजित पवारांची ही टोलेबाजी पाहून रोहित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह उपस्थित इतर आमदारांनाही हसू आवरत नव्हतं.
कल्याण येथील कल्याण जनता सहकारी बँकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या ग्राहकाभिमुख बँकेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे २३ डिसेंबर रोजी आयोजन केले आहे.
अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातील बोगस डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी गोवंडीत घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी रुग्णालय आणि उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी डॉक्टर आणि परिचारिकेला अटक केली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘महारेरा’च्या कार्यालयात आता विकासकांच्या नोंदणीकृत संघटनांच्या केवळ दोन पदाधिकाऱ्यांनाच विकासकांचे प्रतिनिधी म्हणून प्रवेश देण्यात येणार आहे. इतर विकासकांना आणि मध्यस्थी करणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय ‘महारेरा’ने घेतला आहे.
मुंबई, भिवंडी आणि मालेगाव पाठोपाठ राज्यातील १८ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरचा उद्रेक झालेल्या प्रभागांमधील मुलांना रूबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येत आहे. उद्रेकग्रस्त भागात राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत चार लाख बालकांचा शोध घेण्यात आला आहे.
आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं. सविस्तर वाचा
नागपूर : पुणे येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली. बातमी वाचा सविस्तर
सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले. त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली, त्यांना कोणता अधिकार आहे? ही दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे. या विषयी अमित शहा यांच्याशी बैठक झाली असताना आणि बेळगावात कोणालाही अडवणार नाही, असे ठरलं असताना जिल्हाधिकारी त्यांच्या बंदी कशी आणू शकतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
विधानसभेच्या कामाकाजाला सुरूवात झाली आहे. सुरुवातीलचा मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परियचय करून दिला.
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला आहे. ही खाजगी आराम बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. बातमी वाचा सविस्तर
महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ (स्थापना १८५७) १५० वर्षं आणि नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (स्थापना १९१६) १०० वर्षं पूर्ण केलेली विद्यापीठं आहेत. तर नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला येत्या वर्षात म्हणजे २०२३ मध्ये १०० वर्षं पूर्ण होत आहेत. तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना होऊन ७० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाही ६० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला २०२२ मध्ये ६० वर्षं पूर्ण झाली आहेत. बातमी वाचा सविस्तर
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर शहरात सर्वत्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फलक लावण्यात आले असून त्यात मोठ्या प्रमाणात एकनथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही फलकांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पुत्राचे ‘ब्रॅण्डिंग’ केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बातमी वाचा सविस्तर
फळांचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली. आठवड्यापूर्वी मुंबईतील बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी विक्रीस पाठविण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर
महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दौंड तालुक्यात घडली. सोमनाथ बाळू वेताळ (वय १७, रा. रोटी, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेताळ कुटुंबीय रोटी गावातील धुमाळ वस्ती परिसरात राहायला आहे. सोमनाथची आई दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला आली होती.
राज्यातील शिंदे फडणीस सरकार दळभद्री आहे. हे सरकार नेमकं कोणाबरोबर आहे? राज्यात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मात्र, हे सरकार केवळ खोक्याचा गोष्टी करत आहेत. राज्यातील परिस्थितीशी या सरकारला काही देणं-घेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. '५० खोके एकदम ओके' असे फलक घेऊन विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.
आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून महापुरुषांचा अपमान आणि सीमावादासह विविध मुद्द्यांवरून वादळी राहण्याची शक्यता आहे.
#Maharashtra Legislature Winter Assembly Session to start today in Nagpur.
— All India Radio News (@airnewsalerts) December 19, 2022
#WinterSession #WinterSession2022 pic.twitter.com/KTXLcClXGi
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे.