राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना खडसावलं. विधानपरिषदेत अमोल मिटकरी यांनी भाजपा नेते सुब्रहण्यम स्वामी यांचं ट्विट वाचून दाखवलं. यामध्ये नरेंद्र मोदींचा ‘रावण’ असा उल्लेख होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे अत्यंत चुकीचं आहे सांगत संताप व्यक्त केला. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी नरेंद्र मोदींबाबत केलेलं विधान पटलावरुन काढून टाकण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लक्षवेधीदरम्यान अमोल मिटकरी यांनी पंढरपूरच्या कॉरिडोअरचा मुद्दा उपस्थित करताना सुब्रहमण्यम स्वामी यांच्या ट्विटचा दाखला दिला. यामध्ये नरेंद्र मोदींचा रावण असा उल्लेख करण्यात आला होता. यावर सत्ताधारी आमदारांनी जोरदार गदारोळ करण्यास सुरुवात केली. यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

Maharashtra Assembly Session: “ही तुमची जबाबदारी नाही का?”; फडणवीसांच्या उत्तरावर आमदार हसू लागल्यानंतर अजित पवार संतापले

कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी हे अमोल मिटकरींचं विधान नसल्याचं सांगत त्यांची बाजू मांडली. विधान मागे घेण्याचं मान्य झाल्यानंतर हा विषय संपला पाहिजे, अन्यथा पटलावर राहू दे असं खडसे म्हणाले. यावेळी पुन्हा एकदा गदारोळाला सुरुवात झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर आक्षेप नोंदवला.

Maharashtra Assembly Session: सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का? अजित पवार विधानसभेत संतापले; म्हणाले “मराठीची दुर्देशा…”

“आपलं सभागृह सर्वोच्च असून त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पंढरपूरच्या लक्षवेधीवर अमोल मिटकरींच्या भावना चांगल्या होत्या. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मी आषाढीला गेलो होतो त्यानंतर विकासाचा मुद्दा लक्षात घेतला. कोणावरही अन्याय होऊ नये अशी सरकारची भावना आहे. मी सकारात्मकपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो, उत्तरही देणार होतो. पण असं असताना या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असं विधान करणं हा सभागृहाचा, सर्वांचा अपमान आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं की “अशा प्रकारचं विधान कोणीही करता कामा नये याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. आपली आणि त्यांची कुवत पाहिली पाहिजे. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरात त्यांनी गाजवलं आहे. खडसेजी याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे. जी-२० मध्ये संपूर्ण नेतृत्व करण्याची संधी आपल्या देशाला मिळाली आहे. माणूस बोलून जातो, पण आपल्या देशाचं नेतृत्व, गौरव जगभरात होत असताना तुम्हाला वाईट वाटत आहे का?”.

सीमावादावर अधिवेशनात कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

“अमोल मिटकरीजी, तुम्ही जे असं बोलून जाता ते चुकीचं आहे. कोणाच्याही भावना दुखावता कामा नये. आपण आमदार असताना काय बोलत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. हे आपलं वक्तव्य निंदजनक आहे,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

यानंतर विरोधी आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसेंना उद्देशून म्हटलं की “तुम्ही याचं समर्थन करता कामा नये. याचं कोणीही समर्थन करणार नाही”. यावेळी सभापती निलम गोऱ्हे यांनी एकनाथ खडसे यांना व्यत्यय आणत असल्याने खडसावलं.

“मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल काहीही बोललं जात असताना लोकशाहीत आम्ही त्यांचा आदर करत आहोत. पण पंतप्रधानांबद्दल बोललात तर कोणीही सहन करणार नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर सभापतींनी अमोल मिटकरींचं विधान पटलावरुन काढून टाकत असल्याचं स्पष्ट केलं.

यानंतर अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण देताना मी दोनवेळा ते ट्वीट वाचण्यापूर्वी थांबलो होतो, तरीही सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सांगितलं.