नागपूर : राज्यात सायबर गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून दररोज शेकडोवर सायबर गुन्हे राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. त्यामध्ये आर्थिक फसवणूक आणि सेक्स्टॉर्शन या दोनच प्रकारचे सर्वाधिक गुन्ह्यांचा समावेश आहे. आंबटशौकीन ग्राहकांना अडकविण्यासाठी सायबर गुन्हेगार तरुणींचा वापर करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबईत तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहराचा क्रमांक लागतो. तर देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.

पूर्वी सायबर गुन्हेगार ‘बँकेतून बोलत असून तुमचे एटीएम ब्लॉक झाले असून पासवर्ड सांगा’ अशा प्रकारे फसवणूक करीत होते. मात्र, सायबर गुन्हेगारांची ही शक्कल सर्वांना माहिती झाल्याने फसवणुकीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सायबर गुन्हेगाराने आता ‘लाडकी बहिण योजनेच्या बनावट संकेतस्थळापासून ते सेक्स्टॉर्शनपर्यंत’ वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणे सुरु केले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात महाराष्ट्रातून रोज शेकडो जण अडकत आहेत. एक दिवसांत लाखो रुपये सायबर गुन्हेगारांच्या घशात जात आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात गतवर्षी सायबरचे ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे ऑनलाईन फसवणुकीचे असून त्यापाठोपाठ सेक्सटॉर्शनचे गुन्हे आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये २४.४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणात (१५,२९७) दाखल झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (१२,५५६) तर तिसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश (१०,११७) गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून राज्यात ८ हजार २४९ सायबर गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे मुंबईत दाखल झाले असून तब्बल ४ हजार ७०० वर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर पुणे शहर (३५७) आणि तिसऱ्या स्थानावर नागपूर शहराचा क्रमांक (२११) लागतो.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हेही वाचा…राज ठाकरे म्हणतात “लाडकी बहीण योजना लवकरच बंद…”

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

राज्यात हजारोंच्या संख्यात सायबर गुन्हे वाढत आहेत, परंतु गुन्ह्यांची उकल पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. सायबर गुन्ह्यांचा तपास आणि उकल करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र, सायबर पोलीस विभागात तज्ञ पोलीस अंमलदार नाहीत. त्यांना वेळेवर प्रशिक्षण देण्यात येत नाही. तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी लागणारे तंत्रज्ञानही पोलिसांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगार पोलिसांवर भारी पडत आहेत.

हेही वाचा…“विरोधक महिला असुरक्षित असल्याचा ‘ नॅरेटिव्ह’ पसरवत आहे,” उदय सामंत यांचा आरोप

वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोकण्यासाठी पोलीस सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनाही सायबर गुन्हेगारांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. – राहुल माकणीकर पोलीस उपायुक्त, गुन्हे आणि सायबर क्राईम