नागपूर: दणदणीत बहुतेक मिळवणा महायुतीला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन दहा दिवस होत आले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार करता येईना. अधिवेशन तोंडावर आले तरी घटक पक्षात एकमत होईना. मित्रपक्षाची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांवर दारोदार फिरण्याची वेळ आली. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. १५ डिसेंबरला दु. ४ वाजता नागपूरमध्ये राजभवनावर हा सोहोळा होतो आहे. राज्याच्या राजकीय ईतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९९१ मध्ये फक्त एका मंत्र्याने नागपुरात शपथ घेतली होती.

सोमवार १६  डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र अद्याप फडणवीस सरकारमध्ये मंत्रीच ठरले नाही.उपमुख्यमंत्रीव्दय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली परंतु त्यांना खाते वाटप झाले नाही. ते बीन खात्याचे मंत्री आहेत.खाते वाटपावरून घटक पक्षांमध्ये मतभेद आहेत.सर्वाना महत्वाची खाती हवी आहेत.पण भाजप त्यांना द्यायला तयार नाही. त्यामुळे दहा दिवसांपासून विस्तार खोळंबला आहे. अधिवेशनाला तोंड द्यायचे असल्याने मंत्री मंडळ विस्तार नागपूरमध्ये होणार आहे.एकूण महायुतीतील सर्व घटक पक्षांचे ४०ते ४२ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मंत्र्यांना शपथ देण्याचा हा तसा पहिला कार्यक्रम असला तरी यापूर्वी १९९१ मध्ये एका मंत्र्यासाठी शपथविधी सोहळा झाला होता. ते मंत्री होते छगन भुजबळ. त्यांनी अधिवेशन काळातच शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता व त्यांना तत्काळ मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षाने नागपुरात शपथविधी होत आहे. हा फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिलाच मंत्रीमंडळाचा विस्तार आहे.

Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Decision to pay salaries of municipal employees and officers based on biometric attendance
वेळ पाळा, तरच पूर्ण वेतन! का घेण्यात आला हा निर्णय ?
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

हेही वाचा >>>महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा ; ६०० महिलांना मिळणार अर्थसाहाय्य

वास्तविक बहुमतात आलेल्या पक्षाचा  नेता निवडल्यावर तो मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो आणि त्याच वेळी किंवा एक- दोन दिवसात इतर मंत्र्यांना शपथ दिली जाते. महायुती २३२ जागा जिंकून बहुमतात आली.पण सुरूवातीला भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी वाट पाहावी लागली. निकाल लागल्यावर १२ दिवसाने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.मात्र मंत्रीमंडळ निवडण्यास विलंब झाला. आमच्यात मतभेद नाहीत, योग्य समन्वय आहे,भाजप नेते एकीकडे सांगत असून दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मात्र कधी अजित पवार तर कधी एकनाथ शिंदे यांचे उंबरठे झिजवताना दिसत आहे.

Story img Loader