नागपूर : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशी १७ डिसेंबरला नागपूर येथे चर्चा करणार आहेत. सोबतच काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशीही नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी ११ वाजता आमदारांशी आणि दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला आहे. काँग्रेसचे केवळ १६ आमदार आहेत. या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षांतर्गंत विरोध होऊ लागला आहे. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ई-मेल पाठवून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. याबाबत पटोले म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा तीन वर्षांचा कालावधी असतो. मी चार वर्षांपासून अध्यक्ष आहे. त्यामुळे पदमुक्त करण्याची विनंती केली. मी राजीनामा दिलेला नाही. सर्वांना संघटनेत काम करण्याचा संधी मिळायला हवी. पक्ष यावर निर्णय घेईल.

हेही वाचा : नागपुरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’वर महारांगोळी…

पराभव एकट्यामुळे नाही

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले होेते. ही निवडणूक सर्वांनी मिळून लढवली गेली. आता निवडणुकीत पराभवावरून कोणावर आरोप करण्याची वेळ नाही. तर आत्मचिंतनाची वेळ आहे, असे सांगून विधानसभ निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी एकट्याची नसल्याचा दावा पटोलेंनी अप्रत्यक्षपणे केला.

परभणीत लाठीहल्ल्याचे सूत्रधार कोण?

परभणीतील घटनेचा आम्ही निषेध करतो. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी आम्ही सरकारकडे कारवाईची मागणी केली. या सरकारने प्रशासनाला जे काही आदेश दिले त्या आदेशानुसार परभणीत लाठीहल्ला करण्यात आला. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना लाठीहल्ला करण्याचे आदेश कुणी दिले होते? हे समोर आले पाहिजे आणि त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवादी आक्रमक होणार… 

मोदी सरकार ज्या प्रमाणे शेतकऱ्यांवर दिल्लीत लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न करते. त्याप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील घडते आहे का, तसा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? पण आम्ही महाराष्ट्रात हे कदापि चालू देणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra congress incharge ramesh chennithala called meeting of congress mla and defeated candidates on 17 december in nagpur rbt 74 css