एकेकाळी एकसंघतेचा बुरूज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील शिक्षकांची संघटना असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात (विमाशिसं) फूट पडल्याने उद्या, २५ ऑक्टोबरला होणाऱ्या या संघटनेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीकडे साऱ्या विदर्भाचेच नव्हे, तर राज्यातील शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत विदर्भातील सुमारे १९ हजार आजीव सदस्य असलेल्या शिक्षक मतदारांपैकी काही दिवंगत, काही अंथरूणावर, तर काही महिला मतदार असल्याने व त्यापकी अनेकांना रस नसल्याने प्रत्यक्ष मतदान १० हजाराच्या आतच होईल, असा अंदाज आहे. विशेष हे की, विदर्भातील मतदारांना नागपूर येथे धरमपेठ कन्या विद्यालयाच्या केंद्रावर मतदान करावे लागणार असल्यानेही मतदानाचे प्रमाण कमीच राहणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोर्टकचेऱ्यांच्या लढाईत अडकलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने होत आहे. या निवडणुकीची वैशिष्टय़े म्हणजे, संघटनेतील गटबाजीमुळे निवडणूक कमालीची चुरशीची झालेली आहे. कार्यकारिणीत एक अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, दोन विभागीय (अमरावती आणि नागपूर)कार्यवाह, एक कोषाध्यक्ष, अशा ९ जणांची निवड करायची आहे. निवडणुकीत नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे आणि अमरावती विभागाचे माजी आमदार वसंतराव खोटरे या दोन गटात ही निवडणूक होत असून खोटरे यांनी विकास नंदूरकर यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन पॅनेल उभे केले आहे. डायगव्हाणे यांनी श्रावण बरडे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन दुसरे पॅनल उभे केले आहे.
कालपर्यंत डायगव्हाणे आणि खोटरे विधान परिषदेत खांद्याला खांदा लावून नुटाचे तत्कालीन अध्यक्ष आणि आमदार प्रा.बी.टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकहितासाठी लढा देत होते. नंतर मात्र दोघांमधून विस्तव जाणेही कठीण झाले. परिणामत प्रा. बी.टी. देशमुख यांनाही या दोघांमधील वितुष्टाने गेल्या खेपेच्या विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात अकल्पित पराभव पत्करावा लागला. बी.टीं.च्या पराभवाच्या फटका वसंतराव खोटरे यांनाही शिक्षक मतदारसंघात सहन करावा लागला. विमाशिसंच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करता सद्सदविवेकबुध्दीने मतदान करा, असा ठराव नुटाने शिक्षक मतदारसंघाच्या २०१२ च्या निवडणुकीत केला होता. त्याची तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया आजही विमाशिसंमध्ये उमटत आहे. संघटनेतील खोटरे आणि डायगव्हाणे मनोमिलनास अजिबात तयार नसल्याने अखेर गटबाजीचे चित्र या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. विशेष हे की, २०१६ मध्ये विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत विमाशिसंची कार्यकारिणी आपल्या ताब्यात असावी, यासाठी डायगव्हाणे यांचा जोरदार प्रयत्न असल्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
खोटरेंचा भाजप प्रवेश व्यक्तीगत बाब
वसंतराव खोटरे यांनी भाजपात केलेला प्रवेश विमाशिसंच्या कार्यकारिणीच्या निवडणूक प्रचारात डायगव्हाणे गटाने चच्रेचा विषय केला आहे. आज ना उद्या खोटरे भाजपप्रणित महाराष्ट्र शिक्षक परिषदेत सामील होणार, असा प्रचार सुरू आहे. मात्र, तो धादांत खोटा असल्याचे खोटरे गटाचे विकास नंदुरकर यांनी लोकसत्ताला शुक्रवारी सांगितले. खोटरे यांचा हा निर्णय पूर्णत: व्यक्तीगत असून या निवडणुकीचा आणि खोटरेंच्या भाजपात जाण्याचा कोणताही परिणाम सदस्यांवर झालेला नाही. खोटरे आजही संघटनेचे आजीव सभासद आहेत. दुसऱ्या बाजूला डायगव्हाणे गटाचे उमेदवार श्रावण बरडे सेवानिवृत्त असूनही निवडणूक लढवत असल्याचा प्रचार खोटरे गट करीत आहे.