नागपूर : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई झाली नसल्याने हे कर्मचारी महावितरणमधील विद्युत सहाय्यक पदाचे अर्ज भरण्यास मुकले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने संताप व्यक्त केला आहे.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना १५ ते २० वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह इतरही वीज कामगार संघटनांनी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली. त्यावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जानेवारी २३ पासून अनेकदा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह इतर वीज कामगार संघटनांना नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे मान्य केले.

Another delay in the work of Metro 2 B by the contractor
मुंबई : ‘मेट्रो२ ब’च्या कामात कंत्राटदाराकडून पुन्हा दिरंगाई
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
ST employees, ST employees Diwali,
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यास टाळाटाळ
salary
दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा; वित्त विभागाची मान्यता
Mumbai officials ordered strict action against illegal activities ahead of assembly elections
निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश
Applications of aspirants including MLAs from Bhosari and Maval constituencies during assembly elections 2024 Pune print news
पिंपरी : पहिल्याचदिवशी विद्यमान आमदारांसह प्रमुख पक्षांतील इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी गर्दी, ‘यांनी’ घेतले अर्ज
st employees congress
एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्यासाठी शासनाने तत्काळ निधी द्यावा, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
personal secretary of cm dcm
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमदारकीचे वेध

हेही वाचा…‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त

त्याबाबत ऊर्जा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या गेल्या. परंतु, अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, महावितरणकडून ५ हजार ३०० विद्युत सहाय्यकाची पदे भरण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२३ पासून सुरू आहे. त्यातच कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सवलतीच्या घोषणेनंतर अर्ज भरण्याची मुदत वाढवून १९ एप्रिल करण्यात आली. ही मुदत शुक्रवार, १९ रोजी संपणार आहे. त्यामुळे सगळे कंत्राटी वीज कामगार या पदांचे अर्ज भरण्याला मुकणार आहेत. त्यामुळे तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा शासनाला देण्यात आला आहे.

हेही वाचा…महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जानेवारी २०२३ आणि ९ मार्च २०२४ रोजी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना स्थायी पदावर घेता यावे म्हणून वयात सवलती घोषणा केली. परंतु, अंमलबजावणी नसल्याने ही घोषणा ‘जुमला’ ठरत आहे. याबाबत तातडीने बैठकी घेऊन हा प्रश्न मिटवावा. – नीलेश खरात, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ