नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्राच्या प्रत्येक गावच्या भाषेत विविधता आहे. दरवेळी विविध भागातील भाषेचे प्रतिनिधित्व चित्रपटातून करण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘नाळ’च्या निमित्ताने विदर्भातील भाषेला महाराष्ट्राने स्वीकारल्याचा मला आनंद आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी चित्रपटातील बाल कलाकार श्रीनिवास पोकळे, अभिनेत्री दीप्ती श्रीकांत आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.
उत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या मागे प्रेक्षक नेहमी उभा राहतो, हे नाळच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवडय़ात तब्बल १४ कोटींची कमाई केली. महाराष्ट्रात प्रत्येक गावच्या भाषेत विविधता आढळते. पुणे, मुंबई, सोलापूर, विदर्भ सर्वत्र मराठी भाषेत वेगळेपणा आढळतो. मात्र मला माझ्या गावची भाषा पडद्यावर आणायची होती म्हणून मी ‘सराट’मध्ये स्थानिक भाषेचा वापर केला. प्रेक्षकांनी त्याला उदंड असा प्रतिसाद दिला. यामुळे प्रेक्षकांना गावाकडची भाषा आजही आवडते हे स्पष्ट झाले. ‘नाळ ’मध्ये विदर्भाची बोलीभाषा आहे आणि ती अख्ख्या महाराष्ट्राला आवडली आहे. लोकभाषेत अभिव्यक्त होणाऱ्या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरुची संपन्नतेची पावती आहे, असे मंजुळे म्हणाले.
‘नाळ’ मुळे महाराष्ट्रात ओळख मिळाली, असे दीप्ती म्हणाली. चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिल्याबद्दल बाल कलाकार श्रीनिवास याने आनंद व्यक्त केला.