गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरिता जीवनदायिनी ठरणारी महाराष्ट्र एक्सप्रेस एक जूनपासून कात टाकणार आणि आपल्या नवीन स्वरूपात धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मध्य रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत गाड्यांमधील जुने रॅक आधुनिक लिंक हाफमन बुश डब्यांमध्ये रूपांतरित केले जात आहेत. या मालिकेत गोंदियातून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेसचे देखील एक एलएचबी कोचमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. या ट्रेनमध्ये १ द्वितीय वातानुकूलित कोच, ४ तृतीय वातानुकूलित कोच, ७ स्लीपर कोच, ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच, १ सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि १ जनरेटर कार असेल. या बदलामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. कोल्हापूर-गोंदिया एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानका वरून १ जून २०२५ पासून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल. गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस ३ जून २०२५ पासून गोंदिया रेल्वे स्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये केलेले बदल लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी, सक्षम प्राधिकरणाने गोंदिया-नागपूर विभागात मासिक पास धारक, अर्धवार्षिक पास धारक तिकीट धारकांसाठी ३ विशेष स्लीपर कोच एस ५, एस ६,आणि एस ७ नियुक्त केले आहेत. ही सुविधा गोंदियातून ३जून पासून लागू होईल. जेणेकरून मासिक पास धारक, अर्धवार्षिक पास धारक तिकीट धारकांना प्रवास करताना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये. एसपीसी नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

तृतीयपंथीयांवर कारवाई

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक दिलीप सिंग आणि विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली, रेल्वे संरक्षण दल आणि वाणिज्य विभागाचे अधिकारी/टीटीई कर्मचारी यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आणि ट्रेनमध्ये प्रवाशांना अश्लील चाळे करून त्रास देणाऱ्या आणि पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra express gondia district train passenger ssb