चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही येथील शेतशिवरात वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुखरू राऊत (६२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दुसरीकडे, ब्रम्हपुरी तालुक्यातील पद्मापूर येथे वाघाच्या हल्ल्यात पद्माकर मडावी हा गुराखी जखमी झाला. मुखरू राऊत मंगळवारी शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वनविभागाला सूचना दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. सिंदेवाही व ब्रम्हपुरी परिसरात वाघाने दोन दिवसात दोघांचा बळी घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे लावून धरली आहे. दरम्यान, ब्रम्हपुरी तालुक्यातील पद्मापूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी पद्माकर मडावी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Story img Loader