वर्धा : राज्य शासनाच्या महानिर्मिती व केंद्र शासनाच्या सतलज निगम यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आर्वी तालुक्यात सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी ईथल्या निम्न वर्धा प्रकल्पावर हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प साकारणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महानिर्मिती, जलसंपदा तसेच केंद्र शासनाच्या सतलज जलविद्यूत निगमच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू सुमीत वानखेडे यांनी दिली. या प्रकल्पामुळे स्थानीक पातळीवर जवळपास दीड हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

हेही वाचा >>> Saoner Vidhan Sabha Constituency : सुनील केदार यांना पर्याय कोण? भाजप, काँग्रेस दोघांपुढेही उमेदावर देण्याचे आव्हान

शासनाच्या महानिर्मिती कंपनीने यापूर्वीच सर्वेक्षण केले होते. त्यानुसार निम्न वर्धा प्रकल्पातील ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केल्या जाणार आहे. वार्षीक ५०५ मेगावॅट हरीतउर्जा निर्माण होईल. येत्या ३६ महिन्यात हा प्रकल्प उभारल्या जाणार. सौरउर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार. ५०५ मेगावॅटची श्रमता लक्षात घेतल्यास कोळश्याचा वार्षीक वापर ८ लाख ४९ हजार टनाने कमी होणार आहे. या प्रकल्पात ३ हजार ३० कोटी रूपयाची गुंतवणूक होणार असून त्यात राज्य शासनाचा निम्मा वाटा राहणार. या प्रकल्पामुळे आर्वी परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वास सुमीत वानखेडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> नागपूर : ‘पोलिसच माझ्या हत्येचा कट रचत आहेत’; न्यायालयातच…

महाराष्ट्रात अश्या प्रकल्पची ही नांदी ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. सौर ऊर्जा निर्मितीस चालना मिळेल. असे प्रकल्प हे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास पूरक ठरतील. या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पा साठी महाग जिवाष्म इंधन खरेदी करण्याची गरज उरणार नाही. आर्वीच्या या तरांगत्या  प्रकल्पामुळे वार्षिक सीओ २ उत्सर्जन ८ लाख ६२ हजार ४९ टनाने कमी होणार असल्याचा विश्वास महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ५०५ मे. वॅ. क्षमतेचा हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांची विजेची गरज पूर्ण करण्यास समर्थ ठरणार. या भागातील सामाजिक कार्यकर्ते अशोक विजयकर हे म्हणाले की मैलाचा दगड असे हे काम आहे. आर्वी परिसरात विकासकामे आजवर शून्यवत  होती. पण आता वेगाने प्रकल्प येत आहेत. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार. तसेच शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळून भारनीयमन  समस्या कायमची सुटेल. सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश आर्वीकर विसरू शकत नाही.