महाराष्ट्राच्या वन खात्याचे शिकाऱ्यांकडे दुर्लक्ष! छत्तीसगडमधील वाघांच्या शिकारीचे धागेदोरे राज्यात | maharashtra forest department ignores tiger hunting zws 70

नागपूर :  छत्तीसगडमध्ये झालेल्या वाघांच्या शिकारीचा तपास करताना तेथील वनाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात धागेदोरे आढळले आहेत. महाराष्ट्रात दोन वाघांची शिकार झाल्याचे समोर आले असून त्यामुळे शिकाऱ्यांकडे राज्यातील वनखाते काणाडोळा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील एका अधिकाऱ्याने वरिष्ठांना महाराष्ट्रातील शिकारींबाबत सतर्क करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Nagpur Police starts vasuli from sellers
नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…
Sanjay Kelkar Thane, Thane Shivsena support,
ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
maratha reservation balaji kalyankar viral video
“तुम्ही स्वत:साठी पक्ष बदलता, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल; जरांगे पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
mla santosh bangar get election commission notice over phone pe statement
बांगर यांना निवडणूक विभागाची नोटीस; ‘फोनपे’वरील विधानावरील वाद

केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने वाघांच्या शिकारीबाबत ‘रेड अलर्ट’ दिला होता. तत्पूर्वी छत्तीसगडमधील बिजापूरच्या केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने वाघाची कातडी जप्त केली होती. बिजापूरपासून सुरू झालेला या प्रकरणाचा तपास डोंगरगड, सालेकसा, आमगाव, देवरी, साकोली आणि गडचिरोलीपर्यंत येऊन पोहोचला. आता त्याचे धागेदोरे चंद्रपूपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी आमगाव, सालेकसा, देवरीतून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतूनच उत्तर देवरी व सालेकसा सीमेवर (फेब्रुवारी-मार्चमध्ये वाघ मारल्याचे समोर आले. या शिकारीची कल्पना नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील एका अधिकाऱ्याला होती. त्यांनी वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातलीही होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

विशेष म्हणजे छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले असताना छत्तीसगडच्या यंत्रणांनी तातडीने हालचाली करून अटकसत्र राबविले, मात्र महाराष्ट्रात अद्याप कोणतीच हालचाल दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी येत्या आठवडाभरात तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी तत्थ्य समोर येतील, अशी माहिती छत्तीसगडच्या इंद्रावती व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक धम्मशील गणवीर यांनी सांगितले.

वाघांची शिकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. छत्तीसगड वनखात्याची तपासयंत्रणा ज्या गतीने काम करत आहे, त्यापेक्षाही अधिक काम महाराष्ट्र वनखात्याला करावे लागणार आहे.

– सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया