मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे  तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या  नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर २९ सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आज राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्या.  त्यामुळे नागपुरात सुरू असलेले साखळी उपोषण उद्या, दुपारी ४ वाजता मागे घेण्यात येणार आहे. आंदोलन स्थगित करीत असल्याची अधिकृत घोषणा उद्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात जाहीर करण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.