वर्धा : अखेर शासनाच्या स्वस्त वाळू विक्री योजनेस शुभारंभ झाला. वर्धा नदीच्या सावंगी व आजनसरा पात्रातून उपसा झालेल्या वाळूचे पहिले लाभार्थी संभाव्य घरकुलधारक ठरले. त्यांना मोफत वाळू देण्यात आली. रीतेश अवथरे व अन्य सात लाभार्थ्यांना अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून वाळू विक्रीचा श्री गणेशा झाला.
हेही वाचा >>> बुलढाणा: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; नराधमास आजीवन कारावास,खामगाव न्यायालयाचा निकाल
चिंचोली, सावंगी, येळी, रोहणा, आलोडी, मांडगाव, पारडी या वाळू गोदामासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा खणीकर्म अधिकारी दोड यांनी दिली. नवीन वाळू धोरणा प्रमाणे नऊ वाळू डेपो साठी निविदा प्रक्रिया मागविण्यात आली होती.त्यापैकी सहा डेपोची प्रक्रिया पूर्ण झाली.दोन आज सुरू व उर्वरित चार लवकरच सुरू होणार. अवघ्या ६७२ रूपयात एक ब्रास वाळू मिळणार. त्यासाठी जिल्ह्यात सात हजारावर गरजूंनी नोंदणी केलेली आहे.वाळू विक्रीत अनोख्या ठरलेल्या या धोरणाच्या अमल बजावणीचे साक्षीदार म्हणून गावचे सरपंच,डेपो चालक आशिष सावरकर,तहसीलदार व अन्य अधिकारी होते. यामुळे चोरटी वाहतूक, काळा बाजार,हफ्तेखोरी यास पायबंद बसणार असल्याचा शासनाचा दावा आहे.