बुलढाणा : बुलढाणा खामगाव जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के हिस्सा २४५३ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.
यामुळे खामगाव-जालना या रेल्वेमार्गास गती मिळणार आहे. राज्याचा अंतिम अर्थसंकल्प मध्ये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन अर्धा हिस्सा उचलणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. खा.प्रतापराव जाधव यांनी खामगाव-जालना प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरला होता . खा. जाधव यांनी २००९ पासून प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
हेही वाचा…“कुलगुरूंच्या कक्षातील कपाटाचे कुलूप तोडा, अनेक अहवाल उघड होतील!”, विद्यापीठाच्या अधिसभेत खडाजंगी
याला मान्यता मिळाली असून राज्य शासन आपला ५० टक्के हिस्सा उचलणार आहे. याबद्धल खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यांचे आभार मानले आहे.