शासन संप मोडून काढण्याची भाषा करीत आहे. हे तर शासनाची संवेदना बोथट झाल्याचे लक्षण होय. सत्ताधारी नेत्यांनी राजकीय कौशल्य दाखवून मागणी मान्य करावी, असे आवाहन संपकरी नेत्यांनी आज केले. हरिश्चंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात विविध शासकीय कर्मचारी संघटना आजच्या संपात सहभागी झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> संपामुळे वाशीम जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात शुकशुकाट; कामकाज ठप्प, आरोग्य सेवाही प्रभावित

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलनास प्रारंभ झाला. हे शासन शाब्दिक कसरत करीत गैरसमज निर्माण करीत आहे. जनतेच्या मनात आमच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. निवृत्ती वेतनाचा प्रश्न भावनात्मक नसून व्यवहार्यतेचा आहे. सतरा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता मागे फिरणे नाही, असा सूर नेत्यांकडून उमटला.