यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमास आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, माजी राज्यमंत्री डॅा.एन.पी.हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूत गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे.

हेही वाचा >>> नागपूर : “उद्या निवडणुका झाल्या तरी…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

सलग बारा वर्ष राज्याचे मुख्यमंत्री सांभाळतांना त्यांच्या काळात राज्यावर दुष्काळासारखे तीन संकट आले. या संकटांचे संधीत रुपांतरित करुन त्यांनी राज्यात हरितक्रांती घडवली. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना राज्यात आजही सुरु आहे. राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून राज्यातील  शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ई-केवायसी, आधार लिंक, भूमि अभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याच्या लाभ दिला जाईल. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकेनेच उपचाराअभावी सोडला जीव…. रात्रपाळीत डॉक्टरच नसल्याची धक्कादायक बाब उघड

यांचा झाला सन्मान पश्चिम महाराष्ट्रातील कपिल जयप्रकाश जाचक, (मु.पो. जाचकवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) बजरंग सदाशिव साळुंखे (मु.पो. बामणी, ता.सांगोला, जि. सोलापूर), उत्तर महाराष्ट्रातील विश्वास आनंदराव पाटील (मु.पो. लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (मु.पो. कुसुंबा ता.जि. धुळे), मराठवाडा विभागातील बाळासाहेब नारायणराव पडूळ (मुपो लाडसावंगी, ता.जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (मु.पो. कुंभेफळ, जि.औरंगाबाद), कोकण विभागातील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (मु.पो.लांजा, ता. लांजा जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (मु.पो. खानू, ता.जि. रत्नागिरी), विदर्भातील रवींद्र जयाजी गायकवाड ( मु.पो. गायवड, ता. कारंजा जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (मु.पो. लवारी, ता. साकोली, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (मु.पो. चिंचविहिरे ता. राहुरी जि. अहमदनगर) यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.