बुलढाणा : अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पीकविम्याची रक्कम मिळाल्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी मदतीस पात्र आहेत. यातील ९० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ झाल्या आहे.
हेही वाचा >>> अबब! महावितरणलाच तब्बल २१२३ कोटींच्या थकबाकीचा ‘शॉक’, वीज पुरवठा तोडणार…
आज २९ मार्चपर्यंत जवळपास ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यासाठी स्वाभिमानी पक्षातर्फे सातत्याने आंदोलन करण्यात आले होते. सोयाबीन -कापसाला दरवाढ, पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह इतर मागण्यांसाठी ६ नोव्हेंबर २०२२ ला बुलढाणा येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.