नागपूर : राज्यातील महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महिना १५०० रूपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत. मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येते आहे. याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नाही आहेत, त्यांना सहकार्य करत बँकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावी आणि तसे आदेश बँकांना आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा…वैद्यकीय महाविद्यालयाच्या वादात ‘व्हॉट्सॲप’वर शिविगाळ अन् तुंबळ हाणामारी

अंगणवाडी मदतनीस कोण असतात?

अंगणवाडी मदतनीस यांची कामे पाहण्यापूर्वी अंगणवाडी मदतनीस म्हणजे कोण? हे समजावून घेऊयात. महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख आठ हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रामध्ये एक मुख्य अंगणवाडी सेविका कार्यरत असते. मुख्य अंगणवाडी सेविकेस दैनंदिन कामामध्ये मदत करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस या पदाची निर्मिती करण्यात आली. अंगणवाडी मदतनीसास अंगणवाडी हेल्पर असेही म्हणतात. सध्याच्या घडीला या अंगणवाडी मदतनिसांना रुपये ४५०० ते रुपये ५५०० पर्यंत मानधन दिले जाते. महाराष्ट्र राज्यातील या अंगणवाडी मदतनीस तुटपुंजा मानधनांमध्ये देखील अत्यंत प्रामाणिकपणे आपले कार्य पार पाडत असतात. राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये अंगणवाडी सेविका बरोबरच अंगणवाडी मदतनिसांची भूमिका महत्त्वाची आहे.

हेही वाचा…‘लाडक्या बहिणी’चा पीक विम्‍याला फटका! केवळ ३.३६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग, अखेर…

अंगणवाडी मदतनीसची कामे

-अंगणवाडी व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे. विद्यार्थ्यांना अंगणवाडी परिसर प्रसन्न वाटेल. अशीस्वच्छता ठेवणे
-दैनंदिन उपयोगासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. पोषण आहार व इत्यादी कामासाठी आवश्यक असलेले पाणी अंगणवाडी केंद्र मध्ये उपलब्ध करून देणे.
-लाभार्थ्यांसाठी पूरक आहार स्वच्छतापूर्वक शिजवणे व वाटप करणे.
-मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे व मुलांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करणे.
-अंगणवाडी कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्व शालेय शिक्षणाचे साहित्य तयार करणे.
-लहान मुलांना घरी जाऊन आणणे व पुन्हा पोहोचवून देणे.
-वेगवेगळ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी लाभार्थी, माता-पालक अन्य संबंधित व्यक्ती संपर्क साधने.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government to fill 14 thousand anganwadi helper vacancies announces women and child development minister aditi tatkare dag 87 psg
Show comments