नागपूर : जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  ‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून असे ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून सर्वच पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय युवक-युवतीने प्रेमविवाह केल्यास अनेकदा कुटुंबीयांकडून त्यांचा छळ केला जातो. ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकारही घडतात. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’च्या चार घटना घडल्या आहेत.

mumbai police started inquiry to ranveer allahabadias and Samay Raina on obscene and controversial statement
Maharashtra Breaking News LIVE Updates : रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर शिवसेना खासदाराने लोकसभेत मांडला मुद्दा, ‘सेन्सॉर’ची केली मागणी!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
two brothers and friend died drowning after their car fell into a well in Butibori
धक्कादायक! कार शिकत असताना विहिरीत पडली ,दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू
amitabh bachchan company godha announced ipca will begin trial production in Hingani investing 250 crore rupees
अमिताभ बच्चनची कंपनी वर्ध्यात उद्योग सुरू करणार ? अशा घडल्या घडामोडी…
revenge resignation workplace trend
‘Revenge Resignation’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतेय याचे प्रमाण?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
Maghi Purnima Snan Maha Kumbh 2025 New Traffic Rules
Maha Kumbh 2025 New Traffic Rules : महाकुंभ येथे ‘महाजाम’, बॉर्डरवर अघोषित आणीबाणी; नव्या ट्रॅफिक नियमांमुळे प्रयागराजहून भाविकांना किती किमी चालावं लागणार?

यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या असून राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ‘सेफ हाऊस’ निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवली असून लवकरच प्रत्येक जिल्ह्यात ‘सेफ हाऊस’ निर्माण होणार आहेत.

सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा

आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह केल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याच्या जीवाला कुटुंबीय किंवा समाजाकडून धोका असेल तर त्यांना ‘सेफ हाऊस’मध्ये ठेवण्यात येईल. तेथे सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा असेल. ‘सेफ हाऊस’मध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क असून एक महिना ते एका वर्षापर्यंत राहता येणार आहे.

सेफ हाऊसचे स्वागत

करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा पुढाकार घेतला होता. यापूर्वी सातारा येथे सेफ हाऊस तयार करण्यात आले होते. शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अपेक्षा हीच की, ‘सेफ हाऊस’ फक्त औपचारिकता ठरू नये. नवदाम्पत्यांना विश्वास वाटावा अशी व्यवस्था असावी. शासनाला काही मदत लागल्यास आम्ही तयार आहोत. -डॉ. हमीद दाभोळकर, सदस्य, राज्य कार्यकारी समिती म.अंनिस.

Story img Loader