नागपूर : जगभरात ‘मंकीपॉक्स’चा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्यसेवा संचलनालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी केली जाईल. आरोग्य विभागाला विमानतळ-बंदरांवरील आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपासणी सुरू करावी लागणार आहे. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या विलगीकरणासाठी यंत्रणाही उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सचा एक बाधित रुग्णही साथ पसरवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने उपचार करावे लागणार आहेत.

आरोग्यसेवा संचलनालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करावे लागेल. रुग्णालयीन सर्वेक्षणामध्ये आरोग्य विभागाला प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग, औषधशास्त्र आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा लागेल. त्यासाठी गोवर, रुबेला सर्वेक्षण पथकांची मदत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातूनही या आजाराच्या संशयितांबाबत माहिती मिळणे शक्य आहे, असेही आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : २०० किमी फिरा… रस्त्यांतील खड्डे तपासा! ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांना निर्देश

लक्षणे काय?

मंकीपॉक्स आजारात ताप, लसिका ग्रंथी सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी एक वा अनेक लक्षणे दिसतात. हा सौम्य स्वरूपाचा आजार असून २ ते ४ आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये आणि इतर काही जोखमीतील रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यूदर ३ ते ६ टक्के असल्याचेही आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

हेही वाचा : न्यायालयाने फटकारल्यावर ‘ हल्दीराम’च्या अपीलवर शासनाकडून १७ वर्षानंतर निर्णय….

राज्याच्या आरोग्य सेवा संचलनालयाकडून मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वेक्षण, रुग्णाच्या विलगीकरणाची सोय यासह इतर उपाय केले जातील.

डॉ. दीपक सेलोकर, वैद्याकीय आरोग्य अधिकारी, नागपूर महापालिका.