नागपूर : नागपूरसह विदर्भाच्या काही भागात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु, आता पुन्हा उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्णाघाताचे १३ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, राज्यात १ मार्च ते १५ एप्रिल २०२४ दरम्यानच्या कालावधीत उष्माघाताचे एकूण ८२ रुग्ण नोंदवण्यात आले. त्यापैकी १३ रुग्ण हे पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील आहेत.
हेही वाचा : इंदिरा गांधींकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांची टीका
सर्वाधिक ८ रुग्ण वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले. तर चंद्रपूर जिल्ह्यात २ रुग्ण, नागपूर जिल्ह्यात १ रुग्ण, भंडारा जिल्ह्यात १ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद आहे. परंतु, गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकाही रुग्णाची नोंद नाही. तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात अद्याप एकही उष्माघाताचा मृत्यू नोंदवण्यात आला नाही. त्यातच आता नागपूरसह विदर्भातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे रुग्ण वाढण्याची शक्यताही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पूर्व विदर्भात १३ रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला
हेही वाचा : नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
उष्माघाताची रुग्णसंख्या
(१ मार्च ते १५ एप्रिल २०२४)
जिल्हा- रुग्ण
वर्धा ८
चंद्रपूर २
नागपूर १
भंडारा १
गोंदिया १
गडचिरोली ०
एकूण १३
हेही वाचा : “लोकशाहीसाठी भाजप व संघ धोकादायक,” संभाजी ब्रिगेडची टीका; महाविकास आघाडीला पाठिंबा
उष्माघात म्हणजे काय?
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार उष्णतेच्या तीव्रतेशी निगडित जे आजार आहेत, त्यांना उष्माघात म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जेव्हा शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाते आणि शरीरातील एक- एक अवयवय निकामी होतात, ज्यामुळे रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा त्याचा मृत्यूही ओढवतो, अशा परिस्थितीला उष्माघात म्हटले जाऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे काय आहेत?
थकवा, झटका, ग्लानी, भूल, लक्ष न लागणे, स्मृतिभ्रंश, परिस्थितीचे आकलन न होणे आणि नीट बोलता न येणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. या लक्षणांसोबतच डोकेदुखी, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारखी इतर गंभीर लक्षणेही दिसू लागतात.