देवेश गोंडाणे, लोकसत्ता
Nagpur 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर झाला आहे. यावेळी नागपूर विभागाने बाजी मारली असून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागानंतर नागपूर विभागाचा निकाल हा ९६.५२ टक्के लागला आहे.
नागपूर विभागातून एक लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.
(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022 Live: कसा तपासायचा निकाल? जाणून घ्या स्टेप्स)
यंदा नागपूरसह राज्यभरात बारावीच्या परीक्षा गृह महाविद्यालयातील केंद्रांवर घेण्यात आल्या. त्यामुळे परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याचे वृत्त लोकसत्ताने याआधीही प्रकाशित केले होते. त्याचाच परिणाम यंदाच्या निकाल वाढीवर दिसून येत आहे. शिक्षण मंडळाने निकाल वाढीसाठी गैरप्रकार झाल्याचा मुद्दा नाकारला असला तरी निकालात झालेली ही वाढ हे सिद्ध करते. मात्र शिक्षण मंडळाने ही बाब नाकारली आहे.