बुलढाणा : इयत्ता बारावीच्या गणिताच्या पेपर फुटीने राज्यात गाजलेल्या सिंदखेडराजा व लोणार तालुक्यांचा निकाल ९४ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तसेच प्रश्नपत्रिका सार्वत्रिक झालेल्या ‘त्या’ केंद्राचा निकाल सुमारे ८६ टक्के लागलाय. यंदाच्या निकालाचे हे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव या आडवळणावरील ‘प्रसिद्ध’ परीक्षा केंद्रावरून गणिताची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाली. सिंदखेडराजासोबतच लोणार तालुक्यातील बीबी, किनगाव जट्टू येथील व्यक्ती या गोरखधंद्यात गुंतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सिंदखेडराजा व लोणार हे फुटीचे केंद्रबिंदू ठरले. मात्र जेव्हा पेपर सार्वत्रिक झाला त्यावेळी विद्यार्थी केंद्रात होते. त्यामुळे पेपर पुन्हा न घेण्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in