CM Eknath Shinde on lionel messi world cup final: कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पराभूत करत तब्बल ३६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३५ वर्षीय अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता आणि त्याने आपल्या विश्वचषकातील प्रवासाची विजयी सांगता केली. मेसीने या स्पर्धेत सात गोल केले. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात मेसी खेळणार नसल्याने त्याच्या विश्वचषकातील कारकिर्दाचा स्वप्नवत गोड शेवट झाला असं म्हणत चाहते अर्जेंटिना आणि मेसीचं कौतुक करत आहेत. असं असतानाच आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी थेट विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेसीचं कौतुक केलं.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

सभागृहाचं कामकाज समजवून घेण्याच्या उद्देशाने सभागृहात आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन झाले. सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहामधील कामकाज बऱ्याच तास चालतं पण सभागृह बंद पडल्यावर त्याची प्रसिद्धी अधिक होते असं म्हणत कामाकाजाबद्दल बोललं जात नसल्याची खंत व्यक्त केली. “सभागृहामध्ये मी अत्यंत अभिमाने सांगू इच्छितो की आमची दोन्ही सभागृह ज्या पद्धतीने चालतात ते पाहिल्यास कामाच्या तासांची प्रसिद्धी कमी होताना दिसते. पण सभागृह बंद पडलं की त्याची प्रसिद्धी जास्त होते. आपण या अभ्यास वर्गाचा फायदा घ्या,” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

मेसीचा उल्लेख

पुढे मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजावून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं. “उदाहरण द्याचं झालं तर परवा आपण जो काही फुटबॉल विश्वचषकाचा सामना पाहिला तर त्याच्यामध्ये मेसीला आपण पाहिलं. मेसीने तर कमाल केली. हा मेसी काय एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जग्गजेता संघ उभा करण्यामागे जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. डेडिकेशन, डिव्होशन अशा साऱ्याच गोष्टी यात आहेत. हे करत असताना त्यामागे त्याग आणि इतरही बऱ्याच गोष्टी असतात. अशी उदाहरणं अनेक आहेत,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या गोष्टी टाळू नये…

तसेच, “क्षेत्र कुठलं असलं तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत आणि त्या टाळूनही नये,” असा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिला.

दरवर्षी भरतो वर्ग

दरवर्षी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे अभ्यास वर्ग भरवला जातो. विधानपरिषदेच्या सभागृहात हा वर्ग चालतो. कामकाज सुरु होण्याच्या १५ मिनीटे आधी हा वर्ग संपतो. सकाळी ९ ला वगैरे सुरु होतो, तास -दिड तास चालतो. संसदीय- विधिमंडळ कामकाज, लोकशाही वगैरे विषयांवर विविध आमदार यावेळी मार्गदर्शन करतात.

Story img Loader