अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. मतमोजणीमध्ये १४ व्या फेरीपर्यंत काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी आघाडी घेतली होती. १५ व्या फेरीमध्ये अखेर भाजपचे अनुप धोत्रे यांनी डॉ. पाटील यांच्यावर १ हजार ९५४ मताधिक्य मिळवले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. २६ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : रामटेकमध्ये तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसचा खासदार? जाणून घ्या पाच फेरीनंतरचा कल…

१८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे अभय पाटील व भाजपचे अनुप धोत्रे यांच्यात लढत दिसून येत आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. पहिल्या फेरीपासून अभय पाटील यांनी आघाडी घेतली होती. १४ व्या   फेरीपर्यंत ९ हजार ०७४ मतांनी डॉ. अभय पाटील यांनी आघाडी घेतली होती. १५ व्या फेरीत चित्र पालटले आहे. या फेरीमध्ये अनुप धोत्रे यांनी प्रथमच १ हजार ९५४ मतांनी आघाडी घेतली. १६ व्या फेरीमध्ये अनुप धोत्रे यांची आघाडी ३ हजार ७८१ मतांनी वाढली. १६ व्या फेरीअखेरपर्यंत अनुप धोत्रे यांना २ लाख ८७ हजार ९१२, डॉ. अभय पाटील यांना २ लाख ८४ हजार १३१ व ॲड. प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७२ हजार ७०९ मते मिळाली आहेत. आणखी १२ फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.