Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतगणनेत अनेक आश्चर्यचकित करणारे कल बघायला मिळत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राजू पारवे यांच्यावर पाचव्या फेरीअखेर ३४ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी मिळविली. रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदारसंघाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गडकिल्ला मानला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यात बर्वे यांनी पारवे यांच्यापेक्षा अदिक मते प्राप्त केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतगणनेच्या पाचव्या फेरीपर्यंत कामठी विधानसभा क्षेत्रात बर्वे यांना एकूण ३१ हजार १०४ मते प्राप्त झाली तर राजू पारवे यांना १५ हजार ७७९ मते प्राप्त झाली. बावनकुळे यांच्या कामठीच्या किल्ल्यात बर्वे यांना दुप्पट मते प्राप्त झाली.

हेही वाचा…Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यात भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना; भाजपचे अनुप धोत्रे यांची १५ व्या फेरीपासून आघाडी

रामटेक विधानसभा क्षेत्रात काटोल,सावनेर,हिंगणा,उमरेड,कामठी आणि रामटेक असे सहा मतदारसंघ आहेत. यापैकी कामठी मतदारसंघ भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा बालेकिल्ला असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. कामठी विधानसभा क्षेत्रात मते आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्नही केले. मात्र काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी भाजपच्या प्रयत्नांवर पाणी फिरविले. कामठी विधानसभा क्षेत्रात बर्वे यांना पहिल्या फेरीत ५ हजार २१२ तर पारवे यांना ३ हजार ८६६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत पारवे यांनी थोडी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत बर्वेंना ३ हजार ४४८ तर पारवेंना ३ हजार ९५९ मते प्राप्त झाली. तिसऱ्या फेरीपासून बर्वे यांनी पारवे यांच्यावर पुन्हा आघाडी मिळविली.

हेही वाचा…Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : रामटेकमध्ये तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसचा खासदार? जाणून घ्या पाच फेरीनंतरचा कल…

तिसऱ्या फेरीत बर्वे यांना ६ हजार ८०८ तर पारवे यांना ३ हजार २१० मते मिळाली. चौथ्या फेरीत बर्वे यांना पारवेंच्या चारपट ८ हजार ३१५ मते प्राप्त झाली. या फेरीत पारवेंना केवळ २ हजार मिळू शकली. पाचव्या फेरीत देखील असाच कल मिळायला बघायला. पाचव्या फेरीत पारवे यांना २ हजार ७२७ तर बर्वे यांना ७ हजार ३२१ मते प्राप्त झाली. उल्लेखनीय आहे की जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांचे नामांकनपत्र रद्द करण्यात आले होते. यानंतर तातडीने रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली गेली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election result 2024 live vote counting bjp maharashtra president chandrashekhar bawankule s home district congress s shyamkumar barve taking lead from ramtek lok sabha seat tpd