2024 Maharashtra Lok Sabha Election Result Live Updates नागपूर : विदर्भातील भंडारा,अकोला आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक फेरीनिहाय विजयाचे पारडे कधी भाजपच्या बाजूने तर कधी काँग्रेसच्याबाजूने झुकत असल्याने अंतिम निकाल काय लागतो याबाबत उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

अकोला मतदारसंघात सुरूवातीपासून अनपेक्षितपणे काँग्रेसचे अभय पाटील यांनी आघाडी घेतली होती. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात लढत होती. एक्झिटपोलमधे ही जागा भाजपला जाईल असा अंदाज व्यक्त केला होता.मात्र सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली आणि अभय पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र १४ फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम होती. मात्र त्यानंतर अनुप धोत्रे यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली. अमरावती लोकसभा मतदारसंघातही अशीच रस्सीखेच आहे. येथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर होते. सातव्या फेरी अखेर भाजपच्या नवनीत राणा यांनी वानखेडे यांची आघाडी भरून काढत २५४४ मतांनी आघाडी घेतली. नवनीत राणा यांना ही निवडणूक जड जाईलअसा सर्वांचाच अंदाज होता. सुरूवातीच्या फेरींमध्ये त्या मागे पडल्याने अमरावतीत परिवर्तन होणार असा अंदाज बांधला जात होता. मात्र नंतर पुन्हा भाजप – काँग्रेस यांच्यात विजयासाठी रस्सीखेच सुरू झाली.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

हेही वाचा…नागपुरात काँग्रेस शहर कार्यालयाला कुलूप… पाचव्या फेरीनंतर गडकरींनी घेतली १० हजाराची आघाडी…

भंडारा -गोंदिया मतदारसंघात प्रत्येक फेरीनिहाय कल बदल सुरू आहे. येथे कधी भाजपचे सुनील मेंढे पुढे तर कधी काँग्रेसचे प्रशांत पडोळे पुढे असे चित्र आहे. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे सुनील मेंढे पुढे होते. नंतर काँग्रेसचे प्रशांत पडोळे यानी मुसंडी मारली. प्रशांत पडोळे यांचे मताधिक्य १२२४ मतांपर्यंत वाढले. त्यात वाढ होईल असे वाटत असतानाच मेढे यांनी १४६२ मतांची आघाडी घेतली. यात आणखी वाढ होत मताधिक्य २३६७ मतांपर्यत वाढले. नंतरच्या फेऱ्यांमध्ये ते १२७१ पर्यंत कमी झाले. पडोळे यांनी मेंढे यांचे मताधिक्य भरून काढत ९६० मतांची आघाडी घेतली. पुढच्या फेरीत ती ५५३ मतांपर्यंत कमी झाली. नंतरच्या फेरीत ती १७७८ मतांपर्यत वाढत गेली. अंत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या वरील लढतीची मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल काय लागणार याबाबत उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

हेही वाचा…Vidarbha Election Results : विदर्भातील निवडणूक निकालाने भाजप कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता

वर्धा मतदारसंघात अमर काळे यांनी ३१ हजाराने निर्णायक आघाडी घेतली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांनी दहाव्या फेरीअखेर ६३ हजार मतांची आघाडी घेतली होती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी ८ व्या फेरीअखेर ९७ ह जार मतांची आघाडी घेतली होती.

Story img Loader