लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीचे मतदान जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवले असल्याचे दिसून येते.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

गडकरी विरुद्ध ठाकरे ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र पहिल्या फेरीत मतदारांचा कौल कसा असेल असा अंदाज आला आहे. पहिल्या फेरीत मोजणी झालेल्या ६७,६२३ मतांपैकी गडकरी यांना ३९,३८४ मते मिळाली तर ठाकरे यांना २६,३३८ मते मिळाली. गडकरी यांना ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ पश्चिम नागपूरमधून ६१२९ तर ठाकरे यांना ५३१८ मते मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम या विधानसभा मतदारसंघातूनही गडकरी यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे.

आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मविआची विजयाकडे वाटचाल

या मतदारसंघात गडकरी यांना ७२१३ आणि ठाकरे यांना ३०२४ मते मिळाली. दक्षिण नागपूरमध्ये गडकरी यांना ६७१९ तर ठाकरे यांना २६०८ मते मिळाली. पूर्व नागपूरमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपला मताधिक्य मिळाले. गडकरी यांना ६९१९ तर ठाकरे यांना ४८७२, मध्य नागपूरमध्येही गडकरी यांना चांगली मते मिळाली आहे. येथे गडकरी यांनी ९१०१ तर ठाकरे यांना २६९१ मते मिळाली. उत्तर नागपूरमध्ये मात्र अपेक्षेप्रमाणे पहिल्या फेरीपासूनच मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने दिसून येत आहे. येथे गडकरी यांच्यापेक्षा ठाकरे यांना अधिक मते मिळाली आहे. ठाकरे यांना ७८२५ तर गडकरी यांना ३२५३ मते मिळाली.

Story img Loader