लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघात यंदा भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. सहाव्या फेरीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याहून सुमारे ३ हजार ४४० मते जास्त घेतली.
नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. सहा फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. भाजप उमेदवार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मताधिक्य प्रथम सलग पाच फेऱ्यांमध्ये वाढतांनाचे चित्र होते. परंतु सहाव्या फेरीत नितीन गडकरी यांच्यातून विकास ठाकरे यांनी ३ हजार ४४० मते जास्त घेतली. त्यामुळे गडकरी यांचे मताधिक्य सहाव्या फेरीत कमी झाले. सहाव्या फेरीनंतर नितीन गडकरी यांनी एकूण २ लाख २३ हजार ८१० मते मिळाली. तर विकास ठाकरे यांना १ लाख ७९ हजार ८५२ मते मिळाली. आता पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नागपुरातील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोठे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते. मागील दोन्ही निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. यामुळे ते यावेळी ते किती मताधिक्य घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडकरी यांनी विजयाची खात्री असल्याचे आधीच म्हटले आहे. तर नागपूरमधील दलित- मुस्लिम- कुणबी असा “डीएमके’ फॉर्म्युला चालल्याने विकास ठाकरे विजयी होतील असा काँग्रेसचा दावा होता.