लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना झालेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. पाच फेरीनंतर ७३ हजार ५५० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या मतमोजणीचा कल महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचे दिसत आहे.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी
bjp president jp nadda
पंतप्रधानांचे राजकारण विकासाभिमुख; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

रामटेक मतदारसंघातून सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या कृपाल तुमाने यांना डावलून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. पारवे यांची उमेदवारी शिंदे गटाला पसंत पडली नसल्याच्या चर्चा सुरुवातीपासून सुरु होत्या. त्यामुळे ही निवडणूक पारवे यांच्यासाठी कठीण जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता रामटेक मतदारसंघातील मतमोजणीचा सुरुवातीचा कल पारवे यांच्या विरोधात असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा-Lok Sabha Election Result 2024 : महायुतीचे प्रतापराव जाधव मतमोजणीत पुढे;महाविकास आघाडीच्या खेडेकरांकडून ‘पाठलाग’ सुरू

या मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आघाडीवर असून प्रत्येक फेरीत आघाडीवर आहेत. परंतु, अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून चर्चेचा ठरला आहे. काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे याचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावे लागले.

तर बर्वेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार पण राजू पारवे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे इथे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडीतील मित्रपक्षांनी चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले. सध्या काँग्रेसचे बर्वे आघाडीवर असले तरीही रामटेकचा गड कोण जिंकणार हे मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही.