नागपूर : गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षीचा पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार नाशिक येथील दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार, सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी राघवेंद्र नांदे यांना, तर पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील ‘निसर्ग कट्टा’चे अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा – गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून इंडिगो विमानाचे तिकीट बुकिंग सुरू; नागरिकांमध्ये उत्साह

हेही वाचा – अकोला : “ज्येष्ठ सहकारी, एक पक्षनिष्ठ आणि ध्येयवादी नेता गमावला”, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदार गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली

पक्ष्यांसबंधित विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. यात दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येतात. सांगली येथे २३ व २४ डिसेंबरला होणाऱ्या येत्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पुरस्कार वितरण होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pakshi mitra award announced jeewan gaurav award to digambar gadgil rgc 76 ssb