वर्धा : पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि विविध यूट्यूब चॅनलवर ती प्रसारित झाली. हे प्रकरण अत्यंत गंभीर ठरले आहे. पॅट म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी. तो केंद्रीय शिक्षण विभागाच्या स्टार्स उपक्रमाचा भाग आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत होते. २०२४ – २५ या सत्रात झालेल्या परीक्षेतील इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटली. युट्युब व्हायरल झाली. त्यात अशी प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याबाबत मार्गदर्शन आहे. हे झाल्याचे मान्य करीत शैक्षणिक परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी कारवाईचा ईशारा दिला. बंदीची कारवाई करण्याचे त्यांचे निर्देश आहेत.
ही बाब शिक्षण वर्तुळत चांगलीच चर्चेत आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी काही प्रश्न उपस्थित केले.राज्यात प्रथमच पॅट परीक्षा वाईट कारणांनी चर्चेत आली आहे. दोन वर्षांपासून प्रत्येक परीक्षेपूर्वी ताकीद दिल्या जाते. मोहोरबंद लिफाफ्यात प्रश्नपत्रिका पुरविणे, विद्यार्थी तुलनेत त्या कमी भरल्यास झेरॉक्स नं काढणे अश्या व अन्य सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांस केल्या जातात.
पण मोहोरबंद कधीच येत नाही. तुलनेत कमी प्रश्नपत्रिका आल्यास झेरॉक्स काढा, म्हणून सूचना असतात. ग्रामीण भागात झेरॉक्स सोय नसते तेव्हा त्याचे नियोजन कसे करावे, याचे मार्गदर्शन नसते. जमवून घ्या, तुम्हास समजत नाही का, अशी उत्तरे येतात. प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका कधीच पोहचवून दिल्या जात नाही. कुठे केंद्र तर कुठे गट साधन स्तरावरून त्या घ्याव्या लागतात. संपूर्ण महाराष्ट्रात ही स्थिती असल्याचे विजय कोंबे सांगतात.प्रश्नपत्रिका फुटली व ती व्हायरल झाली ही बाब गंभीर व निषेधर्ह आहेच. कारवाई झालीच पाहिजे. पण पुढे काय, याचे उत्तर मिळावे.
मोहोरबंद लिफाफ्यात प्रश्नपत्रिका संच पोहचविण्याची जबाबदारी कोणाची, पुरेश्या संख्येत त्या आल्या नसल्यास झेरॉक्स किंवा अन्य प्रकारे त्या पुरविणार कोण, अपुऱ्या पुरविल्या म्हणून दोषी कोण, केंद्रावर नं देता अन्य ठिकाणाहून त्या घेण्याची बाब कशी, तसे करायचे झाल्यास वाहतूक खर्च कोण देणार, वाहतूक करीत प्रश्नपत्रिका आणतांना अपघात झाल्यास किंवा अन्य प्रकारे मध्येच प्रश्नपत्रिका फुटल्यास जबाबदारी कोणाची असे प्रश्न आहेत. दुर्दैवाने उत्तर देणारे कोणीच नाही, अशी खंत शिक्षक संघटना व्यक्त करीत आहेत.