पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुका असून त्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनीही शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. केव्हाही निवडणुका घेण्यात येऊ द्या, महाराष्ट्र पोलीस सज्ज असल्याचे मत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केले.

उपराजधानीत ३१ व्या महाराष्ट्र  पोलिसांच्या राज्यस्तरीय स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरात राज्यभरातील पोलीस अधिकारी दाखल झाले. राज्यातील सर्व पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक गुरुवारी वनामती येथे झाली.

या बैठकीत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नोंद असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करणे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील भाग व इतर भागांची वर्गवारी करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीनंतर पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी सांगितले की, ही सर्वसामान्य बठक होती.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा सुरू असून त्यानिमित्त एक बैठक घेण्यात येते. आजच्या बैठकीमध्ये गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे, शिक्षेचे प्रमाण वाढवण्यास सांगण्यात आले, तर येणाऱ्या काळात सार्वत्रिक लोकसभा व विधासभा निवडणुका असून त्या निवडणुकांच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले.

दहशतवादाचा बीमोड करू

निवडणूक काळात दहशतवादी हल्ल्याची काही शक्यता असल्यास गुप्तचर संस्थांकडून पोलिसांना माहिती मिळते. त्यानुसार पोलीस काम करतात. पण, कोणतही परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस तयार असल्याचे पडसलगीकर म्हणाले. गडचिरोली जिल्ह्य़ात बुधवारी ट्रक जाळण्याच्या घटनेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी गेले असून त्यासंदर्भात अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.