गोंदिया : राज्याच्या राजकारणात रविवार २ जुलै पासून सत्तासंघर्षचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एकीकडे अजित पवार व प्रफुल्ल पटेल तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी व कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांना खुले समर्थन दिले आहे. एवढेच नव्हेतर ५ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या दोन्ही गटाच्या सक्ती प्रदर्शन बैठकीत गोंदिया जिल्ह्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एमईटी सभागृहात हजेरी लावून अजित पवार,प्रफुल्ल पटेल यांना समर्थन दिले. या घडामोडीला जवळपास ३ ते ४ दिवसांचा काळ लोटत चालला असून पण गोंदिया जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा उचलण्यासाठी कोणतेही हात समोर येतांना दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या गट जिल्ह्यात अप्रभावशील दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा