केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना काय मिळाले? हा अर्थसंकल्प देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारा आहे का? यासह विविध मुद्द्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व अर्थविषयक अभ्यासक अतुल लोंढे यांचे सुलभ व सोप्या भाषेत ‘अर्थसंकल्पाचा अर्थ’ सांगणारे व्याख्यान ७ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा- चंद्रपूर : “मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात”; काँग्रेसचे आंदोलन
नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर येथील विमलताई देशमुख हॉल येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार आहे. माजी क्रीडामंत्री आ. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे तायवडे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.