नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट – क सेवा २०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना अखेर आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र ‘एमपीएससी’ला अद्यापही प्राप्त न झाल्याने संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने पदे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचेही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेले नसल्याने विलंब झाला होता. मात्र, अखेर गट ब च्या ४८० तर गट- क च्या १३३३ पदांसाठी जाहिरात आली आहे.आचारसंहित लागण्यापूर्वी जाहिरात आल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. यात कुठल्या पदासाठी किती जागा आहे याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्यांची काय मागणी होती?

‘एमपीएससी’च्या वतीने राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संयुक्त परीक्षेसाठी मागील वर्षी सात हजारांवर जागांसाठी जाहिरात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षाही घेण्यात आली. यावर्षीही जवळपास आठ हजार जागांसाठी जाहिरात येईल या अपेक्षेने राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षेची तयारी करीत आहेत. यासाठीचा मोठा आर्थिक भार त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होण्याआधी जाहिरात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. अखेर गट – बच्या ४८० आणि गट- क च्या १३३३ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली.

हेही वाचा >>>बुलढाणा : महायुतीचे ठरले; महाविकास आघाडीमध्ये पेच!  उमेदवारीचा तीढा…

अशी आहे गट- ब पदांची विभागणी 

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ ला होणार आहे. ४८० पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बहूप्रतिक्षित अशा पोलीस उपनिरीक्षक पदांचा यामध्ये समावेश आहे. यात सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५४, राज्य कर निरीक्षक २०९ आणि पोलीस उपनिरीक्षक २१६ पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा >>>संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी सुरू; सरसंघचालकांचे यंदाचे भाषण महत्त्वाचे का ? 

संयुक्त परीक्षा व गट- क मधली पदे

उद्योग निरीक्षक -: ३९

कर सहायक-: ४८२

तांत्रिक सहायक -: ९

लिपिक -: १७

लिपिक- टंकलेखक -: ७८६

एकूण -: १३३३

परीक्षा  दिनांक -: २ फेब्रुवारी २०२५

अशा आहेत गट- ब परीक्षेसाठी तारखा

अर्ज सादर करण्याचा कालावधी-  १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.

ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- ०४ नोव्हेंबर.

चालनद्वारे शुल्क भरण्याचा चालन घेण्याचा दिनांक- ०६ नोव्हेंबर.

चालनद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- ०७ नोव्हेंबर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra public service commission recruitment for 1813 posts nagpur dag 87 amy