नागपूर : भारतात गेले वर्षभर अवकाळी पाऊस पडला. उन्हाळ्यात देखील अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. मात्र, शेतकऱ्यांना प्रतिक्षा असते मोसमी पावसाची. कारण याच मोसमी पावसावर त्याचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. हा अंदाज देण्यात थोडीही चूक झाली, तर त्याचे परिणाम हवामान खात्यावर नाही तर शेतकऱ्यांवर होतात. गेल्या काही वर्षात मोसमी पाऊस घोषित करण्यात भारतीय हवामान खाते घाई करत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण बरेचदा खात्याच्याच संकेतस्थळावर मोसमी पावसाचे निकष पूर्ण झालेले दिसून येत नाही. तरीही मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा मात्र केली जाते. मोसमी पावसाचे वारे जोरात आहेत की नाही, ते वारे आले आहे की नाही किंवा कुठून अजून दुसऱ्या दिशेकडून वारे येत आहेत आणि माेसमी पावसाचे वारे उंचीनुसार पुरेसे खोल आहेत का, या गोष्टींकडे बरेचदा दुर्लक्ष केलेले दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज बरोबर असतो. मात्र, महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची घोषणा करण्याची घाईच केली जाते. सध्या भारतीय हवामान खाते वापरत असलेले हवामान मॉडेल हे दाखवत आहेत की मोसमी पावसाचे वारे अजूनही कमजोर आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा विचार करायचा झाला तर केवळ दक्षिण कर्नाटकापर्यंत मोसमी पावसाचे वारे दिसत आहे. उत्तरेकडे योग्य मोसमी पावसाचे वारेच नाहीत. भारतीय हवामान खात्याच्या हवामान मॉडेल्स आणि जगातील इतर मॉडेल्स अनुसार दोन ते तीन दिवसानंतर मोसमी पाऊस स्ट्राँग होईल आणि दहा जून दरम्यान कोकणात दाखल होईल. तर १२ जूनकडे मुंबईत तो दाखल होईल.

हेही वाचा : अमरावती: ‘त्‍यांनी’ चक्‍क स्‍मशानभूमीत सुरू केले उपोषण, एका उपोषणकर्त्‍याची प्रकृती….

सध्याची वाऱ्याची स्थिती आणि पावसाची पद्धत तरी नेमके हेच प्रतिबिंबित करते आहे. तरीही पुणे येथील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सहा जूनला कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मोसमी पाऊस घोषित केला. तर आता उर्वरित महाराष्ट्रात घोषित करतील दोन ते तीन दिवसात घोषित करतील. भारतीय हवामान खात्याने मात्र अजूनही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, इंग्लंडमधील रिडिंग विद्यापिठातील नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मेट्रॉलॉजी विभागातील संशोधन शास्त्रज्ञ अक्षय देवरस यांनी केलेल्या एक्स(ट्विटर) माध्यमावर केलेल्या पोस्टनुसार माेसमी पावसाची प्रगती दक्षिण महाराष्ट्रापर्यंत घोषित करण्यात आली आहे, परंतु भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलनुसार कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर क्वचितच जोरदार आणि खोल मान्सूनचा प्रवाह आहे. मान्सूनचा जोर वाढणार असल्याने दोन-तीन दिवस वाट पाहण्यात अधिक अर्थ आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra rain update arrival of pre monsoon rain rgc 76 css
Show comments