अनिल कांबळे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : देशात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना आता लहान मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मध्यप्रदेश तर तिसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश आहे. शहरांमध्ये दिल्लीनंतर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार, देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत बालकांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मुलांचा मानसिक व शारीरिक छळ, अश्लील चाळे, खून किंवा मुलांवर प्राणघातक हल्ले, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, मारहाण करणे किंवा मुला-मुलींवर अन्य प्रकारचे अत्याचारांच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. मुलींना देहव्यापारात ढकलणे, मुलींची विक्री करणे, अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे किंवा मुलींचा बळजबरी विवाह लावून देण्यासारख्या जवळपास २६ टक्के गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश आहे. मध्यप्रदेशात सर्वाधिक अल्पवयीनांवर अत्याचार झाले असून १९ हजार १७३ गुन्हे दाखल झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्रात एकूण १७ हजार २६१ गुन्हे दाखल झाले आहेत. तिसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश (१६,८३८) आहे. नागालँड (५१) आणि मिझोरम (१२२) या दोन राज्यात सर्वात कमी गुन्हे दाखल आहेत. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ही दोन्ही राज्ये बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये वरच्या स्थानावर आहेत, हे विशेष.

अल्पवयीन मुलांचा खून, मुलींचे लैंगिक शोषण, मुलांवर प्राणघातक हल्ले किंवा त्यांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक घटना (२४५ गुन्हे) घडल्या असून ४० मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला. अशा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रसुद्धा मागे नाही. राज्यात १४६ मुलांचा खून झाला असून ११ मुलींवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. ४८ मुला-मुलींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

नागपूर पाचव्या स्थानावर : अल्पवयीन मुलांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये नागपूर देशात पाचव्या स्थानावर आहे. राज्यात मुंबई पहिल्या स्थानावर (२,७६२ गुन्हे) आहे तर पुणे सहाव्या स्थानावर आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल संरक्षण अधिकारी म्हणून विशेष नियुक्ती असूनसुद्धा बालकांवर होणारे अत्याचार थांबत नसल्याचे चित्र आहे.

शहर    दाखल गुन्हे

दिल्ली ७,०२९

मुंबई   २,७६२

बेंगळुरू १,३४२

इंदोर   १,०८१

नागपूर ९३६

पुणे    ८३५